Viral video: सोशल मीडियावर मिनिटाला काही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे कळत नकळत चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणतात तर काही व्हिडीओ हे विचार करालया भागही पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्या आहेत, पण शिक्षक अजूनही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी तयार नाहीत, कारण सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांना शिकवताना नाही, तर शाळेच्या वेळेत भर वर्गात हेड मसाज करत होती. उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील एका प्राथमिक शाळेचा हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व एकच प्रश्न विचारत आहेत की, कसं घडणार मुलांंचं भविष्य?…

व्हिडिओमध्ये, एक शिक्षिका विद्यार्थ्यांसमोर वर्गात मोबाईल फोनवर शास्त्रीय गाणी वाजवत डोक्याला मालिश करत आणि केसांना तेल लावत असल्याचे दिसून आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, महिला शिक्षिका शाळेतील वर्गात खुर्चीवर बसून केसांना तेल लावत मसाज करत आहे. नंतर केस विचंरत आहे. यावेळी स्पिकरवर मोठ मोठ्यानं गाणीही लावली आहेत.यानंतर, संगीता मिश्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाहा व्हिडीओ

प्राथमिक शाळा मुंडाखेडा येथील या शिक्षिकेचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर टीका होत आहे. अहवालात म्हटले आहे की पालक तक्रार घेऊन शाळेत पोहोचले तेव्हा शिक्षकाने त्यांना शिवीगाळ केली आणि काठीने मारहाण केली. या घटनेनंतर, मूलभूत शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत शिक्षिकेला निलंबित केले. बीएसए डॉ. लक्ष्मीकांत पांडे म्हणाले की, त्यांना सोशल मीडियावरून या घटनेची माहिती मिळाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तपासात असेही आढळून आले की १६ जुलै रोजी, शिक्षिकेने जिल्हा समन्वयक हेमेंद्र मिश्रा यांनी अनुपस्थित आढळून आल्यावर उपस्थिती नोंदवहीत केलेले शेरे खोडून टाकले होते. निलंबनानंतर, शिक्षिका संगीता मिश्रा यांची खुर्जा परिसरातील जमालपूर प्राथमिक शाळेत बदली करण्यात आली आहे.