Viral video: शाळा सुरु झाल्या की विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे दडपण येते. शाळेत तास, होमवर्क आणि शिकवणी यामध्ये विद्यार्थ्यांचे बालपण हारवत चालले आहे. परंतु काही शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवणारे शिक्षक असतात. जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळेतील शिक्षकही वेगळी वाट निवडत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आणि शाळेची गोडी निर्माण करतात.त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात, तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक आणि विद्यार्था डान्स करताना दिसत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल वाह शिक्षक असावा तर असा..

सोशल मीडियावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत, सरकारी अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे सोशल मीडियावर असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ शिक्षकाचा आहे. या शिक्षकानं एका गाण्यावरग भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शिक्षक हे स्टेजवर विद्यार्थ्यांच्या समोर नाचत आहेत. पाव्हणं जेवला का या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आहे. त्यांच्या सोबत विद्यार्थी उभे आहेत. जे वेगवेगळ्या इयत्तेतील दिसत आहेत. या विद्यार्थ्यांनीही शिक्षकांसोबत गाण्यावर ताल धरला आहे.शिक्षकांबरोबरच विद्यार्थीदोखील उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात. अशाच जिल्हापरिषद शाळेत हा उपक्रम राबवला आणि विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक देखील थिरकले. रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> शिक्षिकेचा नादच खुळा! “अशी मी मदन मंजिरी..” गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ vilas_digi_teacher नावाच्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ‘आई शपथ सांगतो असे शिक्षक माझ्या वेळेसही नव्हते’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत उपक्रमाचे कौतुक करत आहेत. एकानं म्हंटलंय, खरचं माहोल केला सरांनी, खरोखर सलाम आहे शिक्षकांना आणि त्याच्या समर्पित वृत्ती ला!!अभिमान आहे अशा शिक्षकांचा, माणसाने आयुष्य हे हसत खेळत जगलं पाहीजे ., खरं तर अशाच शिक्षकांची गरज प्रत्येक मुलाला प्रत्येक शाळेला हवी तेव्हा मुलांना प्रत्येक विषयात गोडी निर्माण होईल. अशा अनेक कमेंट केल्या आहेत.