Viral Video :- सोशल मीडियावर आजकाल शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. काही सरकारी शाळेतील शिक्षक मुलांना विविध गोष्टी शिकवताना दिसून येत असतात. याआधीसुद्धा शाळेतील अनेक व्हायरल व्हिडीओ तुम्ही पहिले असतील, ज्यात शिक्षक ‘गुड टच बॅड टच’चा अर्थ सांगताना, काना मात्रांचे खेळ शिकवताना, मुलांना अभ्यासक्रमातील अनेक गोष्टी सोप्या पद्धतीने शिकवताना तुम्ही आजवर पहिल्या असतील; तर आता शाळेच्या व्हायरल व्हिडीओच्या यादीत आणखीन एक व्हिडीओ जोडला गेला आहे. पण, यात शिक्षक अभ्यास किंवा खेळ शिकवताना नाही तर शाळेतील विद्यार्थिनींना भन्नाट डान्स शिकवताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल होणारा व्हिडीओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ एखाद्या सरकारी शाळेचा आहे, ज्यात एक शिक्षक आणि काही विद्यार्थिनी जमल्या आहेत.आणि व्हिडीओत ९०’च्या दशकातील प्रसिद्ध चित्रपट ‘ताल’ मधील “ताल से ताल मिला” हे गाणं वाजताना दिसत आहे आणि या गाण्यावर शिक्षक विद्यार्थिनींना डान्स शिकवताना दिसून येत आहे. विद्यार्थिनीसुद्धा शिक्षकाला बघून अगदी हुबेहूब स्टेप्स करताना व्हिडीओत दिसून येत आहेत. शिक्षकसुद्धा मन लावून आवडीने डान्स शिकवताना दिसून येत आहे, तसेच विद्यार्थिनीसुद्धा नम्रपणे डान्स शिक्षकाकडून शिकून घेत आहेत. डान्स शिकवताना शिक्षकाचे हावभाव, शिक्षकाचा डान्स करतानाचा जोश, डान्स स्टेप्स आणि विद्यार्थिनींची डान्स शिकण्याची आवड या व्हिडीओत अगदी बघण्यासारखी आहे. ताल से ताल मिला या गाण्यावर शिक्षकाने विद्यार्थिनींना शिकवलेला हा भन्नाट डान्स एकदा बघाचं..

हेही वाचा :- कारच्या सीटमध्ये बनवला स्पेशल दरवाचा, दारु तस्करीसाठीचा विचित्र जुगाड पाहून पोलिसही चक्रावले

व्हिडीओ नक्की बघा :-

सोशल मीडियावरील हा व्हिडीओ (@MihirKJha) यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.शाळेतील रोजच्या अभ्यासातून एक दिवस विद्यार्थ्यांचासुद्धा आगळावेगळा जावा आणि विद्यार्थ्यांना विविध विषयात रुची निर्माण व्हावी, यासाठी असे अनेक शिक्षक वेगवगळे प्रयोग विद्यार्थ्यांसाठी करताना सोशल मीडियावर नेहमीच दिसून येतात.