आजचे ऑप्टिकल इल्युजन हे एक पेन्सिल रेखाचित्र आहे, ज्यामध्ये तुम्हाला लोकांची संख्या शोधावी लागेल. या गुंतागुंतीच्या चित्रात एकूण ७ व्यक्ती आणि एक मांजर आहे. हे सर्व लोक कुठे लपले आहेत शोधण्यासाठी तुम्हाला बारीक लक्ष द्यावे लागेल. इतकंच नाही तर ज्यांना आपली आयक्यू पातळी तपासायची आहे, त्यांच्यासाठी हे रेखाचित्र चित्र उत्तम आहे. जो शक्य तितक्या लवकर उत्तर देईल त्याला सुपर ह्यूमन म्हटले जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑप्टिकल इल्युजन हा एक दृश्य भ्रम आहे. असे दिसते की आपले डोळे आपल्याला फसवत आहेत. तथापि, असे इल्युजन पाहून आपले डोळे कधीकधी गोंधळतात. शास्त्रज्ञांनुसार, इल्युजनचे कारण हे आहे आहे की आपले डोळे अशाच गोष्टी पाहतात ज्या आपण आधीही पाहिलेल्या आहेत. आता हे चित्र पाहा आणि त्यातील लोकांची संख्या शोधा. तुम्ही चित्रात किती लोक पाहू शकता? ते चार किंवा चारपेक्षा जास्त आहेत का? हे चित्र एक पेन्सिल रेखाचित्र आहे जे डार्कसीडीने टिकटॉकवर शेअर केले होते.

सप्तपदी दरम्यान वधूचा स्टेजवरच मृत्यू; यानंतर वराने तिच्या बहिणीशी बांधली लग्नगाठ

या ऑप्टिकल इल्युजनमध्ये तुम्हाला किती लोक सापडले? जर तुम्हाला फक्त दोनच लोक दिसले असतील तर तुमची आयक्यू पातळी चांगली नाही. पुन्हा चित्र पाहा आणि लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा. चित्रात सात लोक आहेत. काही चित्राच्या वरच्या डाव्या बाजूला आहेत, काही चित्राच्या मध्यभागी कारजवळ आहेत. तळाशी एक मांजर लपली आहे. जर तुम्हाला सर्व ७ माणसं आणि एक मांजर सापडली असेल, तर तुम्ही एक सुपर जीनियस आहात, आणि जर तुम्हाला ते अद्याप सापडले नाहीत, तर काही फरक पडत नाही, आम्ही तुम्हाला चित्रात माणसं कुठे आहेत ते सांगू.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

Photo : Social Media

हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven men and a cat are hidden in this optical illusion whoever finds out will be a super genius pvp
First published on: 07-06-2022 at 10:00 IST