Health Special: अभ्यासात मूल मागे पडू लागले की, सगळ्यात आधी शंका येते, आपल्या मुलाला बुद्धी कमी नाही ना, मतिमंदत्व/ गतिमंदत्व तर नाही ना? पण मग लक्षात येते, अरे याला/ हिला सगळे काही पटकन समजते, पटकन आत्मसात करता येते, मग तरी अभ्यासात हा/ ही मागे का? शालेय प्रगतीपुस्तकात ती हुशारी का दिसून येत नाही? या प्रश्नाच्या उत्तरांपैकी महत्त्वाचे उत्तर म्हणजे मुलांमध्ये दिसून येणारी ‘विशिष्ट अध्ययन अक्षमता’ (Specific learning disorder).

विशिष्ट अध्ययन अक्षमता

शाळेमध्ये वाचन, लिखाण आणि गणित शिकवणे सुरू झाले की, काही मुलांना काही विशिष्ट गोष्टींमध्ये अडचण येते आहे, हे शिक्षकांच्या किंवा पालकांच्या लक्षात येऊ लागते. वर्गात शिकवलेले सगळे समजते, विचारलेल्या प्रश्नांची तोंडी उत्तरे देता येतात, पण वर्गात धडा वाचायला सांगितला, तर याच मुलाची गडबड होते, वह्या पूर्ण नसतात आणि गणित काही जमत नाही. जेव्हा वाचनाची क्षमता विकसित होत नाही तेव्हा त्याला ‘ विशिष्ट वाचन अक्षमता’(specific learning disorder with impairment in reading/ dyslexia) असे म्हणतात.

Success story
शेळ्या चरवून अभ्यास; परिस्थितीवर मात करीत जिद्दीने JEE Advanced परीक्षेतील उत्तुंग यशाला गवसणी! मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
what is sleepwalking and why people walk in sleep
झोपेत चालल्याने इमारतीवरून पडून मुंबईत एकाचा मृत्यू; काय आहे हा आजार? लोक झोपेत का चालतात? तज्ज्ञ काय सांगतात….
how to take steam correctly
चेहऱ्यावर वाफ घेताना आवर्जून करा ‘ही’ गोष्ट; नाहीतर डोळ्यांना होऊ शकते इजा! लक्षात घ्या डॉक्टरांचा सल्ला….
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: लोकांना अवलंबून ठेवून मतपेढी मजबूत?
Former Police Officer Julio Ribeiro, Julio Ribeiro, Plight of Muslims Under Modi Shah Government, Plight of Muslims Under Modi Shah Government in india, uneducated muslim situation in india, Julio Ribeiro Efforts with Mohalla Committees Post Mumbai Riots, Mohalla Committees Post Mumbai Riots
‘त्या’ धाडसी मुस्लीम मुलीविषयी तुम्हाला माहीत आहे का?
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!

हेही वाचा : जादू की झप्पी गरजेची; मिठी मारल्याने खरंच तणाव कमी होतो? काय आहे ‘टच थेरपी’? जाणून घ्या फायदे

विशिष्ट वाचन अक्षमता

विद्यार्थ्याची वाचनात वयाप्रमाणे प्रगती होत नाही, वयाच्या मानाने वाचन जमत नाही. लहानपणापासूनच ह्या मुलांना आवाज आणि शब्द यांचा मेळ घालत येत नाही. त्यामुळे ‘क’ कमळ किंवा न नळ हे ध्वनी, उच्चार आणि ती अक्षरे म्हणजे क, न, ळ इत्यादी यांची सांगड घालता येत नाही. समोर दिसणारी अक्षरे, शब्द, त्यांचे उच्चार आणि अर्थ या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे समजण्याची प्रक्रिया मेंदूमध्ये होत नाही आणि वाचन जमत नाही, तुटकपणे, एक एक शब्द वाचला जातो आणि संपूर्ण वाक्य एकत्रितपणे, सुसंगतपणे वाचणे कठीण असते. वाचलेल्याचा अर्थ समजणेही कठीण असते. साधारण ७-८ वर्षाच्या मुलांमध्ये वाचन अक्षमता लक्षात येते आणि त्याचे निदान करता येते. जसजसा अभ्यास कठीण होतो, ही अडचण वाढते आणि अभ्यासाची प्रगती खुंटते.

विशिष्ट लेखन अक्षमता

कधी कधी विशिष्ट लेखन अक्षमता(specific learning disorder with impairment in written expression) आढळून येते. लेखनाच्या बाबतीत काही मुले आपल्या वयाच्या मानाने मागे राहतात. लिहिणे ह्या मुलांना खूप कठीण जाते. ऱ्हस्व-दीर्घ, काना -मात्रा, अशा चुका (spelling errors), व्याकरणातील चुका, विरामचिन्हातील चुका, वाक्यरचनेतील चुका या सर्वसाधारणपणे दिसून येतातच, शिवाय हस्ताक्षर चांगले नसते, लिहिताना सारखी किंवा थोडाच फरक असलेली अक्षरे लिहिताना उलटीसुलती होतात; उदा, त ऐवजी थ, य ऐवजी थ, म ऐवजी भ किंवा b च्या जागी d इत्यादी. लिखाण अर्थपूर्ण असते, संकल्पना स्पष्ट असते, पण ती लिहून व्यक्त करणे लेखन अक्षमता असलेल्या मुलांना जमत नाही.

हेही वाचा : तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…

विशिष्ट गणित अक्षमता

अध्ययन अक्षमतेचा तिसरा प्रकार म्हणजे विशिष्ट गणित अक्षमता(specific learning disorder with impairment in mathematics). यामध्ये मुलांना गणित जसजसे अवघड होत जाते, तसतसे त्यात अडचणी जाणवतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा संज्ञा(symbols) समजणे कठीण होते. तीन-चार आकडी संख्या वापरून करायला सांगितलेली गणिते करताना गोंधळ उडतो, उदा. ३६८५ x ४८६. जी गणिते वाक्यांमध्ये विचारली आहेत आणि त्यांचे रूपांतर आकड्यांमध्ये करून ती सोडवायची आहेत ती करणे त्यांना खूपच कठीण जाते. ही गणिते त्यांना समजत नाहीत. उदा. ३ तासात एक गाडी ८० किमी ताशी या वेगाने किती अंतर कापेल? (word problems). भूमितीतली प्रमेयं सोडवणे जमत नाही. आकृत्या पाहून, समजून काढणे कठीण जाते. अशा अनेक गोष्टींमुळे शालेय प्रगती वयानुसार होत नाही.

तपासण्या करा

आपले मूल आळशी आहे, त्याला अभ्यास करायला नको, जाऊ दे अभ्यासात त्याला काही जमत नाही, शाळेतून काढूनच टाकू; असा विचार करण्याआधी आपल्या मुलाची अभ्यासात प्रगती होत नाही, पण त्याची बुद्धिमत्ता तर चांगली आहे, असे वाटत असेल तर अध्ययन अक्षमतेसाठी तपासण्या करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी मनोविकारतज्ज्ञ किंवा बालरोगतज्ज्ञ यांच्याकडे जावे लागते. बहुतेकदा समस्या काय आहे हे लक्षात न आल्यामुळे मुलांना रागे भरले जाते, घरी मार खावा लागतो, शाळेत शिक्षा होते आणि प्रगतीपुस्तकावर लाल खुणा येतात त्या वेगळ्याच!

शालेय विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ १०% मुलांमध्ये अध्ययन अक्षमता असू शकते. मुलांमध्ये मुलींपेक्षा याचे प्रमाण जवळजवळ तिप्पट असते. शाळेमध्ये प्रगती वयानुसार आणि बुद्धिमत्तेनुसार आढळत नसेल तर अशा मुलांना योग्य वेळी, किंबहुना लवकरात लवकर निदान होण्यासाठी आणि उपाय सुरू होण्यासाठी पाठवले गेले पाहिजे. विशिष्ट अध्ययन अक्षमता असलेल्या अनेक मुलांमध्ये अतिचंचलता दिसून येते. दोन्ही गोष्टी एकत्र असल्या तर समस्या अधिकच तीव्रपणे जाणवते. मुलांमध्ये विशिष्ट अध्ययन अक्षमता कमी जास्त प्रमाणात असते, परंतु प्रत्येक मुलाला मदतीची आवश्यकता असतेच. वर्गात नीट वाचता येत नाही, लिखाण चांगले नाही म्हणून शिक्षकही ओरडतात आणि नाराज असतात, घरीही दर परीक्षेच्या वेळेला आणि रिझल्टच्या वेळेला संघर्ष असतो, एवढेच नाही तर इतर मुलेही मनसोक्त चिडवतात, कधी कधी खूपच त्रास देतात (bullying). या सगळ्याचा मुलांच्या मनावर अतिशय परिणाम होतो.

हेही वाचा : दर आठवड्याला डझनभर अंडी खाल्ली तरी वाढणार नाही कोलेस्ट्रॉल पातळी! नवे संशोधन काय सांगते? वाचा

अनेकांना अतिचिंता, उदासीनता (anxiety disorders, depression) असे विकार होतात. वागणुकीचेही विकार होतात, आक्रमकता वाढते. उद्धटपणा वाढतो, पालकांशी प्रत्येक विषयात भांडण होते.(conduct disorder, oppositional defiant disorder) अशा भावनिक आणि वर्तणूकीच्या समस्यांमुळे(emotional and behavioral problems) शालेय प्रगतीवर आणखीच विपरीत परिणाम होतो आणि मुलाच्या भविष्यातील विकासावर परिणाम होतो.

उपचारात्मक शिक्षण

लवकरात लवकर तपासणी, विशिष्ट अध्ययन अक्षमता आणि त्या बरोबर असलेल्या इतर समस्या आणि विकारांचे निदान आणि उपाय होणे या साठी पालक आणि शिक्षक दोघांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. अध्ययन अक्षमतेसाठी त्याच्या तीव्रतेनुसार ‘विशेष उपचारात्मक शिक्षण’(special remedial education) विशेष शिक्षकांच्या सहाय्याने केले तर उपयोग होतो. जितक्या लवकर निदान आणि विशेष उपचारात्मक शिक्षण सुरू करता येईल तितका त्याचा अधिक चांगला उपयोग होतो आणि मुलाची शालेय प्रगती सुधारते. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती अशी की केवळ शालेय प्रगती मुलाच्या क्षमतांचे मापन करू शकत नाही. प्रत्येक मुलाची आपली अशी क्षमता असते, कुणाची अभ्यासात, कोणाची कलेमध्ये तर कोणाची खेळामध्ये! त्या त्या मुलाची क्षमता ओळखून त्याला त्या त्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी उपलब्ध करून देणे हेच आपले काम आहे!