”सिगारेट आरोग्याला हानीकारक आहे, एक सिगारेट माणसांचे आयुष्य कमी करु शकते, सिगारेट हेच कॅन्सरसारख्या आजारांचे मूळ आहे” अशा जनजागृती करणा-या जाहिराती आपण टीव्हीवर ऐकतो पण कधी कल्पना केलीत की सिगारेटमुळे स्फोटही होऊ शकतो? मग हा व्हिडिओ तर प्रत्येकांनी पाहिलाच पाहिजे. अनेकांना ध्रुमपान करून झाल्यानंतर हातातली पेटती सिगारेट रस्त्यावर फेकून देण्याची सवय असते पण यापुढे ही सिगारेट आजूबाजूला फेकण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा नाहीतर या माणसासारखी वेळ तुमच्यावरही यायची.
इराण मधल्या तेहरान इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका माणसाने ध्रुमपान करून सिगारेट खड्ड्यात टाकण्याची मोठी चूक केली. ही चूक त्याला एवढी महागात पडली की विचारायची सोय नाही. सिगारेट खड्ड्यात टाकल्या टाकल्या काही सेंकदात मोठा स्फोट झाला अन् माणूस जखमी होऊन बाजूला पडला. हा नेमका स्फोट कशामुळे झाला हे कळले नाही कदाचित या खड्ड्यातून जाणा-या पाईपलामधून मिथेन वायू लिक झाला असावा आणि पेटती सिगारेट पडताच त्याच स्फोट झाला असावा असा निष्कर्ष काढला जात आहे. हा जखमी इसम येथे येण्यापूर्वी एका माणसांने या खड्ड्यात काहीतरी टाकले होते त्यामुळेच कदाचित स्फोट झाला असावा असे म्हटले जात आहे. आता या स्फोटामागचे कारण काहीही असले तरी सिगारेट रस्त्यात फेकताना दहावेळा विचार करा एवढं नक्की.