Shark Attack Video : शार्क हा समुद्रातील सर्वात धोकादायक, हिंस्त्रक मासा मानला जातो. त्याच्या एका हल्ल्यात कोणत्याही प्राण्याचा, माणसाचा क्षणात मृत्यू होऊ शकतो. तो कोणत्याही प्राण्याला अतिशय क्रूरपणे मारून फाडून खाऊ शकतो. जर एखाद्या शार्कला पाण्यात त्याची शिकार सापडली तर तिला जगणे खूप कठीण होते. सध्या अशाच एका भक्षक शार्कचा शिकार करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल. व्हिडीओत एक व्यक्ती पोहताना दिसतेय. याचदरम्यान ती एका शार्कच्या तावडीत सापडते आणि पुढे असे काही घडते की पाहून तुमचाही थरकाप उडेल.
व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक शार्क समुद्रात पोहणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करतोय. त्या व्यक्तीची शार्कच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड सुरू आहे, म्हणून तो वेगाने पोहतोय, पण शार्कच्या ताकदीपुढे त्याची ताकद संपते आणि शेवटी तो शिकार बनतो.
व्हिडीओमध्ये दिसतेय की, शार्क त्या जिवंत व्यक्तीवर जोरदार हल्ला करतो. यावेळी ती व्यक्ती स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, हायपाय मारते, पोहून दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. कारण तो शार्कच्या जबड्यात इतक्या वाईट प्रकारे फसतो की त्याची जिवंत सुटका होणं जवळपास अशक्य होते, अखेर शार्क त्याला ठार मारतो.
व्हिडीओमध्ये असेही दिसते की, शार्क त्या व्यक्तीच्या शरीराचा एक एक अवयव तोडून खात होता, तरी ती व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत होती. पण, शेवटी तो शार्कसमोर फार काळ टिकू शकला नाही. ही भयानक घटना जवळच्या बोटीवरील लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे.
या भयावह घटनेचा व्हिडीओ @RadioGenoa नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की, ही घटना इजिप्तच्या हुरघाडा किनाऱ्यावरील आहे. जिथे एका व्यक्तीवर शार्कने इतक्या क्रूरपणे हल्ला केला. यात त्याने जीव वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी त्याला मरण पत्करावे लागले.