पाण्याची घागर घेऊन उभ्या असलेल्या महिलेचा हा पुतळा किती आकर्षक दिसतो आहे. या मोहक कलाकृतीकडे पाहिले तर आपसूकच स्तुतीचे बोल तुमच्या तोंडी आल्यावाचून राहणार नाही. पण जरा नीट या पुतळ्याकडे पाहिले तर खरी गंमत तुमच्या लक्षात येईल. हा पुतळा नसून एक चालती बोलती मुलगी आहे. काय आर्श्चय वाटले ना ? पण निरखून पाहिले तर लक्षात येईल कि हा पुतळा नसून शाळेत शिकणा-या एका मुलीचा पुतळ्याच्या वेशभूषेतील फोटो आहे.
ही वेशभूषा इतकी अचूक आहे कि पाहणा-याला पुतळा कि माणूस असा संभ्रम मनात आल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रतिभा कारांजी असे या मुलीचे नाव आहे. कर्नाटकमधल्या मॉर्डन स्कूलमध्ये नववीत शिकणारी हि विद्यार्थींनी आहे. शाळेतल्या वेशभूषा स्पर्धेसाठी तिने ही वेशभूषा केली. तिला इतका अचूक मेकअप केला होता कि अनेकांना हा पुतळा नसून मुलगी असल्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीणच जात होते. या वेशभूषेसाठी तिला पहिले पारितोषिक देखील मिळाले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2016 रोजी प्रकाशित
VIRAL : ओळखा पाहू या पुतळ्यातली गंमत !
हा पुतळा पाहिल्यावर तुमचाही गोंधळ उडेल
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-09-2016 at 17:33 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: She won best fancy dress competition