न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फारशी चमक दाखवू न शकलेल्या शिखर धवनची सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली जाते आहे.

के. एल. राहुलला दुखापत झाल्यामुळे शिखर धवनला संघात संधी मिळाली. मात्र शिखर अवघी एक धाव काढून मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. शिखर धवनच्या बॅटमधून सध्या धावांचा ओघ आटला आहे. मात्र तरीही त्याला संघात स्थान देण्यात आले होते. शिखरला संघात स्थान दिल्यामुळे गौतम गंभीरला मैदानावर उतरण्याची संधी मिळाली नाही. मात्र राहुलच्या जागी संधी मिळालेल्या शिखरला संघ व्यवस्थापनाच्या विश्वासाला न्याय देता आला नाही. शिखरच्या या अपयशानंतर त्यांच्यावर सोशल मिडीयावर चांगलीच टीका होते आहे.

नुकताच महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर बेतलेलेा एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचाच आधार घेत ट्विटरवर शिखरची खिल्ली उडवण्यात आली आहे. ‘शिखर धवनच्या जीवनावर चित्रपट करायचा असेल, तर काय होईल ? तो एका लघुचित्रपटाच्याही निम्मा असेल’, असे ट्विट करण्यात आले आहे. तर एका व्यक्तीने ‘शिखर धवन एम. एस धोनी चित्रपटाची तिकीटे काळ्या बाजारात विकण्यासाठी लवकर बाद झाला’, असे ट्विट केले आहे.

लवकर बाद होणाऱ्या आणि संघाला चांगली सुरुवात न करुन देणाऱ्या शिखर धवनला सोशल मिडीयाने चांगलेच रडारवर घेतले आहे. ‘शिखर धवनमुळेच तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज प्रतिस्पर्धी संघासाठी सलामीचा फलंदाज होतो’, अशी मिश्कील टीका शिखरवर करण्यात आली आहे. ‘शिखर धवन भारतीय संघासाठी तितकाच महत्त्वाचा आहे जितका पूनम पांडेसाठी तिचा वेशभूषाकार महत्त्वाचा आहे’, अशा शब्दांमध्ये शिखरची खिल्ली उडवण्यात आली.

https://twitter.com/Funny_Leone/status/781715357698371584

https://twitter.com/thefield_in/status/781708739921473536

https://twitter.com/ImAbhishek_/status/781713493309415424