Shocking video viral: रस्ते अपघाताच्या बातम्या जगभर ऐकायला मिळतात. भारताबाबत बोलायचं झालं तर दरवर्षी इथं रस्ते अपघातांची संख्या वाढतच चाललीय. डोक्याला गंभीर दुखापत होऊन दरवर्षी शेकडो तरुणांना, विशेषतः दुचाकीस्वारांना जीव गमवावा लागतो. यामुळेच लोकांना हेल्मेट घालण्यासह सुरक्षा उपायांचं पालन करण्याचा सल्ला दिला जातो. असे अनेक व्हिडिओदेखील आहेत, ज्यात हेल्मेट घातल्यामुळे लोकांचे प्राण वाचले आहेत, तर दुसरीकडे हेल्मेट घातलं नसल्यानं अनेकांना आपले प्राण गमवावेही लागले आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
आपल्या आयुष्यात कधी कोणती घटना घडेल याचा काहीच भरवसा नाही. आयुष्यात सुख-दु:खाचे क्षण हे येत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी सामोरं जाणं हाच एक त्यामागे मार्ग असतो. पण सुखाच्या क्षणांचं क्षणार्धात एखाद्या दुर्घटनेत बदल होणं म्हणजे दुर्दैव! अशा दुर्घटना अनेकदा बघायला मिळतात. असाच एक भयंकर अपघात जो हेल्मेटचं महत्त्व सांगून गेलाय.
हेल्मेट न घातल्यामुळे एक व्यक्ती जीवनीशी गेलाय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु आहे. अशातच एक बाईकचालक रस्यावर येतो आणि त्याच्याच मागून एक बस सुद्धा येते. यावेळी या बसचा धक्का या बाईक चालकाला लागतो आणि तो थेट बसल्या चाकाखाली येते. पुढे संपूर्ण बस व्यक्तीच्या डोक्यावर जाते आणि अक्षरश: व्यक्तीच्या डोक्याचा चेंदामेंदा होतो. हेच जर त्याने यावेळी हेल्मेट घातलं असतं तर कदाचीत तो बचावला असता. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर reels_edits_dp नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एकानं म्हंटलंय, “कधी कळणार लोकांना स्वत:च्या जीवाची किंमत” तर दुसऱ्या यूझरनं ‘हेल्मेटनं जागीच मृत्यू रोखला असता’, अशी टिप्पणी केली.