Shocking video: डोंगर, दऱ्या आणि नद्यांचे सौंदर्य पाहायला कोणाला आवडतं नाही. धबधब्यांवरून कोसळते पाणी आणि आकाशातील ढगांना स्पर्श करणाऱ्या डोंगरांमध्ये सुट्ट्या घालवण्याची एक वेगळीच मज्जा असते पण फोटो, रिल्स बनवण्याच्या नादात तरुणाई हरवून गेली आहे. जीवाची पर्वा न करता रिल्स बनवताना दिसत आहे. सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखवतात. बऱ्याचदा लोक यासाठी आपल्या जीवाची देखील पर्वा करत नाही. हीच हिरोगीरी कधीकधी जिवावरही बेतत. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.

असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच एक समुद्रातील भयावह व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे. यावेळी एक तरुणी त्याठिकाणी फोटोशूट करत आहे. किनाऱ्यावर उभी असलेली महिला हळू हळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते. यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही. आणि ती लाटेसोबत समुद्रात खेचली जाते. ती उठण्याचा प्रयत्न करते तेच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचते. दरम्यान फोटो काढत असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो, मात्र क्षणात महिला दिसेनाशी होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> प्रेमात प्रयत्न दोन्ही बाजूने महत्त्वाचे! गर्लफ्रेंडला प्रपोज करायला गेलेल्या तरुणालाच मिळालं सरप्राईज; VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.