Black Cobra Viral Video: साप म्हटलं की, अनेकांच्या अंगावर शहारे येतात. सापाच्या फुत्कार टाकणाऱ्या फुसफुस अशा आवाजानंही जीव घाबरतो. त्यातून जर समोर एखादा काळा नाग आला, तर मग विचारायलाच नको. अशाच एका थरकाप उडवणाऱ्या दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो जंगलाच्या खूप आत गेलेल्या भागातून घेतला गेला असावा, असं वाटतं आहे.
जंगलाच्या खोल गाभ्यात एका क्षणात घडलेली ही घटना तुमचा श्वास रोखून धरते. एका छोट्या शांत बसलेल्या सापावर अनपेक्षितपणे मृत्यूचा घाला पडतो. एक काळा नाग अचानकपणे त्याच्यावर झडप घालतो आणि… पुढचं दृश्य थरकाप उडवणारं. डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या आत त्या नागाने सापाला गिळंकृत केलं आणि हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
या Video मध्ये जे घडतं, ते पाहून तुमचाही श्वास काही क्षण थांबेल. पानगळती झालेल्या झाडाखाली एका कोपऱ्यात शांत बसलेला एक साप अचानक हालचाल करतो… आणि त्या निमिषार्धात कुठून तरी एक काळा नाग झपाट्यानं समोर येतो आणि त्या छोट्या सापावर तुटून पडतो. काही क्षणांतच तो त्याला गिळून टाकतो. हो, हे खरं आहे की, एका नागानं दुसऱ्या सापाला गिळलं.
हा व्हिडीओ इतका भीतीदायक आहे की, तो पाहताना अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. याआधी तुम्ही सापांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; पण एक साप दुसऱ्या सापाला गिळतोय, असं दृश्य फार क्वचित पाहायला मिळतं. या घटनेने सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एक युजर म्हणतो, “व्हिडीओ करणाऱ्यानं त्या छोट्या सापाला वाचवायला हवं होतं”, तर दुसरा लिहितो, “आज खरंच समजलं आपलेच आपल्याला डसतात!” तिसरा युजर म्हणतो, “हे दृश्य पाहून झोप उडाली!”
कमेंट बॉक्समध्ये शॉकिंग इमोजीचा वर्षाव सुरू आहे. काही लोकांनी अजून अशाच विचित्र आणि धक्कादायक सापांच्या हालचालींचे व्हिडीओ शेअर केले आहेत. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात एका बेडकानं सापाला गिळलं होतं.
येथे पाहा व्हिडीओ
निसर्गाचा हा क्रूर आणि रौद्र चेहरा पाहून तुमचंही मन सुन्न होईल. पण एक गोष्ट नक्की हा व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिलात, की तो विसरू शकणार नाही.
सूचना : हा व्हिडीओ पाहताना तुमचं मनोबल ठाम ठेवा. कारण- सापांच्या या जगात कोण कुणाला कधी गिळेल, हे सांगता येत नाही.