Shark Attack Video: शार्क हा समुद्रातील खतरनाक माश्यांपैकी एक आहे. हा मासा पाण्यामध्ये रक्त असल्यास त्याकडे लगेच आकर्षित होतो. जमिनीवरील प्राण्यांप्रमाणे समुद्रामध्येही प्रत्येक जलचर जीव ठराविक भागांमध्ये आढळतो. वास्तव्याच्या ठिकाणी हस्तक्षेप केल्याने ते जीव समोरच्या जीवावर बचावाच्या दृष्टीने हल्ला करतात. शार्क माश्यांच्या बाबतीमध्येही असेच घडत असते. शार्क सहजा माणसांना त्रास देत नाहीत. पण अनेकदा शार्कने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक थरराक घटना सध्या समोर आली आहे. ज्यात एका शार्कने समुद्रात पोहणाऱ्या पर्यटकाला अक्षरशः गिळून टाकले.
शार्क माशाला एखादं सावज सापडलं की काहीही झालं तरी तो आपली शिकार सोडत नाही. त्याचीच प्रचिता या व्हिडीओमध्ये आली आहे. हा मासा फारच आक्रमक असतो. तो आपल्या शिकारीवर तुटून पडतो. समुद्रातील इतर लहान मासेदेखील त्याच्यापासून दूर राहतात. याच एका शार्कने थेट माणसालाच खाऊन टाकलं आहे. शर्क माशाने माणसावर केलेल्या हल्ल्याचा संपूर्ण व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. समोर बोटीमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये शार्क मासा पाण्या एका माणसावर हल्ला करताना दिसतोय. तर माणूस या हल्ल्यापासून स्वत:चे संरक्षण करताना दिसतोय.
शार्क हल्ला केल्यानंतर काही वेळ त्या माणसाला मोकळं सोडताना दिसतोय. याच काळात हा माणूस शार्कपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र पुढे शार्कने त्या व्यक्तीच्या डोक्यावर हल्ला करून त्याला थेट पाण्यात बुडवल्याचे दिसत आहे. या जोरदार हल्ल्यानंतर समुद्रात फसलेल्या माणसाचे फक्त पाय दिसत आहेत. शेवटी शार्क माशाने या माणसाला आपल्या जबड्यात पकडून थेट पाण्यात खोल नेले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसतं की तो व्यक्ती शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी धडपड करत होता. मात्र शार्कसमोर फार काळ टिकू शकला नाही आणि त्याचा शेवटी भयंकर पद्धतीने अंत झाला.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @RadioGenoa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय की,
शार्कनं नऊ वर्षांच्या मुलीवर केला होता हल्ला
अलीकडेच, फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ पोहत असताना एका शार्कने तिच्यावर हल्ला केल्याने एका ९ वर्षांच्या मुलीला जवळजवळ तिचा हात गमवावा लागला होता, असे तिच्या कुटुंबीयांनी आणि साक्षीदारांनी सांगितले.