Viral Government Office Assault: सरकारी कार्यालयात भरदिवसा अचानक गोंधळ सुरू झाला… कर्मचारी किंचाळत होता, पण मदतीला कुणीच पुढे आलं नाही. समोर बसलेल्या लोकांना एक क्षण काय घडलं हे समजायच्या आत, एक व्यक्ती दुसऱ्यावर तुटून पडली. या झटापटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ज्याने तो पाहिला तो हादरून गेला आहे.
एक सरकारी लिपिक… आपलं काम करत होता… पण त्याला असा बेदम मार मिळेल हे कोणालाही वाटलं नसेल. इतकंच नाही तर केस ओढणे, सरकारी कर्मचाऱ्याला खाली पाडून मारणे एका बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी एक चकित करणारी घटना घडली, जी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सरकारी कार्यालयात एका कर्मचाऱ्यावर भरदिवसा हल्ला होतोय आणि तोही काही गुन्हेगारांकडून नव्हे तर खुद्द कंत्राटदार व त्याच्या साथीदारांकडून. एका व्हायरल व्हिडीओने हे संपूर्ण प्रकरण उघडं पाडलं आहे. तुमचंही डोकं फिरेल, कारण या घटनेत फक्त शिवीगाळच नाही तर शारीरिक मारहाणीचा थरारही स्पष्ट दिसतो.
सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात दिसतं की एक कंत्राटदार आणि त्याचे काही साथीदार पीडब्ल्यूडी ऑफिसमध्ये (बांधकाम विभाग) घुसतात आणि तिथल्या एका वरिष्ठ लिपिकाला अक्षरश: फरफटत मारहाण करतात.
या हल्ल्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ लिपिक आपले नियमित काम करत होते. एवढ्यात एक संतप्त कंत्राटदार कार्यालयात येतो आणि थेट पेमेंटबाबत चौकशी करतो. बिलावर सही हवी होती, पण क्लर्कने बिल कनिष्ठ अभियंताकडे तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगितले.
पण… इथेच भडकलेला कंत्राटदार अचानक रागाने चवताळल्यासारखा लागतो. त्याने एका क्षणात शिव्यांची लाखोली वाहत लिपिकाला खाली खेचले आणि थेट मारहाण सुरू केली. सरकारी खुर्ची, फाईली आणि बाकीचं सगळं बाजूला फेकत त्या क्लार्कवर तो तुटून पडतो, ज्याने व्हिडीओ पाहणाऱ्याचेही अंग शहारेल.
इतकेच काय, त्या लिपिकाचे केस ओढले गेले, त्याला खुर्चीतून ओढत खाली पाडले गेले… आणि हे सगळं होत असताना आजूबाजूचे इतर कर्मचारी अवाक् होऊन पाहात होते. काही क्षणांनी ते मध्ये पडले, मारहाण करणाऱ्याला वेगळं केलं, पण तोवर खूप उशीर झाला होता.
या घटनेची माहिती तात्काळ पोलिस प्रशासनाला देण्यात आली असून, स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षकांनी याप्रकरणी तपास सुरू केल्याचं सांगितलं आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाल्याचं वृत्त नाही. ही थरारक घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथील पीडब्ल्यूडी कार्यालयात घडली आहे.