Viral Video : आपल्या देशात दर दिवशी हजारो लोक रेल्वेनी प्रवास करतात. रेल्वेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी रेल्वेतील मजेशीर व्हिडीओ, तर रेल्वेतील भयानक गर्दीचे व्हिडीओ, कधी रेल्वे अपघाताचे व्हिडीओ तर रेल्वे प्रवास दरम्यानचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. रेल्वे अपघाताचे व्हिडीओ पाहून अनेकदा अंगावर काटा येतो. अनेक लोक जीवघेणा प्रवास करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनमधून एक व्यक्ती एका चिमुकल्यासह खाली पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक रेल्वे रूळावरुन रेल्वे जात आहे. पुढे दिसेल की अचानक एका रेल्वेच्या डब्यातून एक माणूस एका चिमुकल्यासह खाली पडतो. हा माणूस डब्याच्या दरवाज्याजवळ उभा असतो. अचानक त्या माणसाचा तोल जातो आणि एका चिमुकल्याला घेऊन खाली पडतो. या माणसाला आणि चिमुकल्याला खाली पडताना पाहून स्टेशनवरील लोक धावताना दिसतात आणि त्यांच्या मदतीला धावतात. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून या माणसाची दया येईल.
पुढे हा व्हिडीओत तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसेल. या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची भयंकर गर्दी दिसत आहे. हा व्हिडीओ आरा स्टेशनवरील आहे. या स्टेशनवर काही लोकं भयंकर गर्दी असताना सुद्धा रेल्वेमध्ये चढताना दिसत आहेत तर काही लोकं उतरताना दिसत आहे. आरा स्टेशन हे बिहार राज्यातील एक रेल्वे स्टेशन आहे.

हेही वाचा : लल्लाटीं भंडार! शाळकरी मुलींनी सादर केला सुंदर जोगवा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chhathpuja2020 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला” तर एका युजरने गर्दी पाहून लिहिलेय, “वाढती लोकसंख्या” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपल्या देशाला जनरल आणि 2S ट्रेनची आवश्यकता आहे.” अनेक युजर्सनी असे प्रकार बिहार राज्यात दिसत असल्याचे लिहिलेय. काही युजर्सनी व्हिडीओ पाहून संताप सुद्धा व्यक्त केला आहे.