Nagpur Shocking video: देशातील विविध राज्यात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षेकरता सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरीही मोठ्या शहरातील लहान गल्ल्यांमध्येही महिलांवरील अत्याचार थांबलेले नाहीत. वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय. सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशांत महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुली फिरतायत. अशीच एक धक्कादायक घटना आता नागपूरमधून समोर येत आहे. भर रस्त्यात तरुणीसोबत केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे सर्वच संतापले आहेत. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर बाजारात खूप गर्दी आहे, लोक येत जात आहेत. अशातच एक तरुणी त्या रस्त्यावरुन जात असते. यावेळी एक व्यक्ती समोरुन येतो आणि थेट तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करतो. भर दिवसा बाजारात अशाप्रकारे तरुणीचा विनयभंग करणं इतकं धक्कादायक आहे मात्र या व्यक्तीनं कसलाही विचार न करता हे धक्कादायक कृत्य केलंय. यावेळी तरुणीनं लगेच उलट फिरत त्याला मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं तिथून पळ काढला. आजूबाजूचे लोकंही तरुणीला मदत करायचं सोडून फक्त बघत उभे असल्याचं दिसत आहे.
लहान मुलींपासून वयस्कर महिलांची सुरक्षा ही जगभरातील मोठी चिंता आहे. देश कुठलाही असो तरुणी असो वा विवाहीत महिला यांच्यासोबत पुरुषांचे गैरवर्तनचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी अनेक कठोर कायदे करण्यात आले पण अजूनही नराधम वेठणीस येतं नाही आहेत.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DObsbNfEsmp/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nagpur_hotspot नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतप्त झाले असून, अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत. अनेक लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. कोणी या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवंय, असं लिहिलंय. तर कुणी अशा नराधमांना ठेचून काढा असं म्हंटलंय.
