Viral video: सिंह ज्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं आणि कोब्रा ज्याला किंग म्हटलं जातं. एक बलाढ्य आणि दुसरा विषारी, जंगलातील हे दोन्ही खतरनाक किंग आमनेसामने आले तर काय होईल? हे प्रत्यक्षात दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जंगलातील या दोन खतरनाक प्राणी आमनेसामने आले आणि त्यांच्यात फायटिंग झाली. या फायटिंगमध्ये कुणी बाजी मारली, फायटिंगचा शेवट कसा झाला हे तुम्हीच या व्हिडीओत पाहा. सिंह आणि वाघाची गर्जना तर सगळ्यांनाच माहीत आहे. काहींनी ती प्रत्यक्ष ऐकली असेल, तर काहींनी रील्स आणि चित्रपटांमध्ये. पण सापाचा गुरगुरण्याचा आवाज ऐकणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. बहुतेक लोकांना सापाचा फक्त एकच आवाज माहीत असतो, तो म्हणजे फुत्कारण्याचा, पण किंग कोब्राचा गुरगुरण्याचा आवाज तुम्ही कधी ऐकला आहे का? जर नसेल, तर या व्हिडीओमध्ये पाहा.

जंगलातील या दोन खतरनाक प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या प्राण्यांना इतर प्राण्यांवर हल्ला करताना तुम्ही पाहिलं असेल. पण जंगलातील किंग असलेल्या या दोन किंगच्या फायटिंगचा हा व्हिडीओ. दोघंही एकमेकांवर अक्षरशः तुटून पडले आहेत. व्हिडीओत पाहू शक सुरुवातीला सिंह दिसतं आहे. त्यांच्यावर एक खतरनाक कोब्रा लक्ष ठेवून आहे. व्हायरल व्हिडिओत बघू शकता की, एक कोब्रा एका मातीच्या ढिगाऱ्यावर फणा काढून बसला आणि सिंहाकडे एकटक बघत आहे. सिंह सापाकडे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा साप फणा आणखी उंच करत सिंहाला आव्हान देतो. हा नजारा फारच रोमांचक आहे. कारण किंग कोब्राच्या आक्रामकतेनंतरही सिंह हिंमत दाखवतो. सिंहाला जेव्हा कोब्राच्या ताकदीची जाणीव होते, तो घाबरून मागे सरकतो.

दरम्यान शेवटी तुम्ही बघू शकता की, सिंह काही वेळ कोब्राच्या आजूबाजूला फिरतो. आधी तर असं वाटतं की, सिंह सापाची शिकार करण्यास तयार आहे, पण जसजसा कोब्रा आपला फणा आणखी उंच करतो तेव्हा सिंह जरा घाबरतो. त्याची चाल हळू होते आणि शेवटी त्याला समजतं की, कोब्रासोबत पंगा घेणं काही बरोबर राहणार नाही. हळूहळू तो मागे सरकतो आणि नंतर तिथून निघून जातो.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत लोकांमध्ये वाद आहे. काही जण म्हणतात, की हा व्हिडिओ पूर्णपणे खरा आहे आणि सिंह आणि कोब्रा यांच्यातील अनपेक्षित सामना दाखवतो. त्याच वेळी, काही लोकांचा असा विश्वास आहे की हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार केला गेला आहे.