Crocodile attack video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरीचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अगदी सिंह, वाघ, बिबट्या अशा शक्तिशाली प्राण्यांचंही मगरीसमोर काही चालत नाही. हे प्राणीसुद्धा मगरीला घाबरतात. मगर किती क्रूर प्राणी आहे, याचा अंदाज अनेकदा लोकांना नसतो. अशाच एका मगरीच्या चतुराईचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बोटीतून फेरफटका मारत असताना एका तरुणाला पाण्यावर मगरीचं प्रेत तरंगताना दिसलं.सर्वांना असं वाटलं की ही मगर मेली आहे त्यामुळे पाण्यावर तरंगत आहे, मात्र पुढच्याच क्षणी मगरीनं डाव पलटला. या तरुणानं मेलेली मगर बघून उत्सुकतेपोटी बोट मगरीच्या दिशेनं वळवली. त्याला वाटलं की, मगर तर मेलेलीच आहे, आपल्याला काय करणार? त्यामुळे तो निर्धास्त होता. पण जसा तो जवळ गेला, तसा मगरीनं अचानक जोरदार हल्ला केला! हा झटका इतका जबरदस्त होता की, क्षणभर सगळं थांबलेलं वाटलं.ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे ज्यामध्ये हे भयानक दृश्य पाहायला मिळत आहे. त्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
पहिल्यांदा पाहताना हे दृश्य नेमकं काय आहे, हे तुम्हाला समजणार नाही. मात्र काही वेळातच एक मगर या व्यक्तिच्या अंगावर हल्ला करते. एकंदरीतच हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत असून चांगलाच व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ hereyourjumpscare नावाच्या इन्स्टग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय…”काय गरज आहे का मृत्यूच्या दारात हात घालण्याची…” तर आणखी एकानं म्हंटलंय की, “याला म्हणतात ये मगरी मला खा”