Shocking video: मॅगी खायला फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनासुद्धा आवडते.मॅगी हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.तुम्ही किंवा तुमची मुलं मॅगीप्रेमी असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बस दो मिनट…’ असे करीत ‘मॅगी’ तयार करणाऱ्या माधुरी दीक्षितची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल. मात्र, ‘मॅगी’ आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. अशातच सध्या समोर आलेल्या व्हिडीओवरून दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यालाही महाग ठरणार असल्याचे दिसत आहे. एका महिलेनं दावा केला आहे की, एका मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे होते. याचा किळसवाणा व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल.
तुम्ही जर भूक लागल्यावर झटपट बनणारी मॅगी सारखी खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण, एका महिलेला मॅगीमध्ये चक्क अळ्या आणि किडे आढळले आहेत. या घटनेमुळे मॅगीबद्दल पुन्हा एकदा शंकेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे तुम्हीही जर असे प्लास्टिकबंद खाद्यपदार्थ आणत असाल तर ते खाताना काळजी घ्या. दरम्यान, या प्रकरणावर संबंधित कंपनीकडून अजून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मॅगीमध्ये पांढऱ्या रंगाच्या जिवंत अळ्या दिसल्या आहेत. यानंतर पुरावा म्हणून तिनं याचा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर अपडलोड केला. व्हिडीओमध्ये मॅगीमध्ये अळी स्पष्ट दिसत आहे, हा किळसवाणा व्हिडीओ पाहून तुम्हीही इथून पुढे मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल एवढं नक्की.
पाहा व्हिडीओ
दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ मम्मी-पप्पांना अन् बच्चे कंपनीला द्यावीशी वाटत असली तरी आरोग्य लक्षात घेता, खाताना नक्कीच विचार करावा लागेल. ‘मॅगी’सारखे अनेक खाद्यपदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. टिव्हीवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातींना बळी पडून आपण दोन मिनिटांत आपल्या आरोग्याचे अनारोग्य करण्यास कारणीभूत ठरतो की काय, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.