Unhygienic vegetables video : जलद वितरण अॅप्समुळे कोट्यवधी लोकांचे जीवन सोपे झाले आहे. किराणा मालापासून ते इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत काही मिनिटांत तुमच्या दाराशी पोहोचवल्या जातात. दरम्यान, सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला आहे की एका तरुणानं झेप्टोवरुन कोबी मागवला होता. पण त्याला काय मिळालं पाहा. हा व्हिडीओ पाहू अशाप्रकारे भाजा मागवणं तुमच्याही जीवावर बेतू शकतं.सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कोबी कृत्रिमरीत्या कसा विकला जातो याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कोबी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण सांगत आहे की, त्यानं झेप्टो या फास्ट डिलीव्हरी अॅपवरुन काही भाज्या मागवल्या होत्या. त्यामध्ये कोबी सुद्धा होता. मात्र दोन दिवस ठेवूनही तो ताजा दिसत असल्यानं तरुणाला शंका आली. त्यानंतर त्यानं हा कोबी बनावट आहे का हे तपासण्यासाठी गॅसवर ठेवला तर ‘बनावट’ खाद्यपदार्थ विकून त्यांची फसवणूक झाल्याची खात्री पटली. कारण हा कोबी प्लॅस्टीकचा होत्या त्यामुळे तो वितळत होता.  हा कोबी प्लास्टिकचा असल्याचा तरुणानं दावा केला आहे. आपला दावा सिद्ध करण्यासाठी तरुणानं कोबीची पाने जाळण्याचा प्रयत्न केला पण त्याला काहीच झाले नाही. त्यानंतर पुढे जाऊन पान फाडण्याचा प्रयत्न केला,पण तो पुन्हा अयशस्वी झाला. खरं तर, तरुणाने दावा केला की, जळल्यानंतर पान आणखी ‘घट्ट आणि ताणलेले’ होते एखाद्या प्लास्टिकप्रमाणे.

पाहा व्हिडीओ

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकरी यावर संताप व्यक्त करीत आहेत. हा व्हिडीओ mokssh या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाले आहेत. “आता खायचं तरी काय?” अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. एकानं म्हंटलंय, “लोकांच्या जीवाशी खेळ आहे हा” तर आणखी एकानं “आता फक्त जीव घ्यायचा बाकी आहे ”