Shocking video: मोबाईल कोण वापरत नाही? सगळेच वापरतात. मोबाईल वापरण्याचं प्रमाण जसं वाढलं, तसंच मोबाईलरांचंही प्रमाण वाढलं. कुणाच्या मोबाईलवर चोरटे कुठे, कधी हात टाकतील याचा काही नेम नाही. अशातच एक चोरीचा व्हिडीओ समोर आलाय. पण, व्हिडीओ पाहताना नेमकी चोरी झाली कुठे हे पहिल्यांदा पाहिल्यानंतर कळणारच नाही. त्यासाठी व्हिडीओ पुन्हा स्लो-मोशनमध्ये पाहावा लागतो. तेव्हा जाऊन कळतं, की नेमकी चोरी कशी, कोणत्या मिनिटाला केली गेली. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही इथून पुढे सतर्क राहाल.

कुठलीही चोरी करण्यापूर्वी चोर प्रचंड अभ्यास करतात असं म्हटलं जातं. सर्वात आधी ते वस्तूचं बारीक निरिक्षण करतात. ती वस्तू कशी चोरता येईल या बद्दत नियोजन आखतात. अन् चोरी फसलीच तर काय करायचं याबाबतही प्लान बी रेडी असतो. चोरांना इतकी तयारी ही करावीच लागते. कारण चोरी करणं हा गुन्हा आहे. अन् जर तुम्ही पकडला गेलात तर तुमची काही खैर नाही. पोलीस नंतर मारतात आधी पब्लिकच चांगली धुलाई करते. अन् शेवटी तुरुंगाची हवा खावी लागते हे तर वेगळंच. मात्र सध्या समोर आलेला चोरीचा व्हिडीओ पाहून म्हणाल या चोरांनी अभ्यास नाही तर चोरी कशी करायची यावर पीएचडीच केली असावी.

ही घटना दिल्लीमध्ये घडली असून तिथल्या सार्वजनिक बसमध्ये चोरांचा उच्छाद वाढत चालल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. गर्दीचा फायदा घेत हे चोर भरदिवसा सर्रास चोरी करत आहेत. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चोरांची एक टोळी अगदी ठरवून आणि नियोजन करून एसी बसमध्ये चढते. बसमध्ये चढल्यानंतर ते एका प्रवाशाला लक्ष्य करत चारही बाजूंनी त्याला घेरतात. गर्दीचा फायदा घेत, अतिशय सफाईदारपणे ते त्याच्या खिशातून मोबाईल चोरतात आणि काही क्षणातच तो फोन बंद करून लपवून ठेवतात. ते एकमेकांशी हातवाऱ्यांद्वारे गप्पा मारण्याची अॅक्टींग करतात, धक्काबुक्की करतात आणि त्यातच मोबाईल लंपास करतात. हे चोर इतक्या सराईतपणे मोबाईल चोरी करतात की व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल,

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @DELHIBUSES1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने म्हंटलं आहे की, “बापरे काय चोर आहे” दुसरा म्हणतो “चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील.” तर आणखी एकानं धरुन चोपला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया दिलीय.