Nashik viral video: भांडणं पाहायला कोणाला आवडत नाहीत? त्यात सासू सुनेची भांडणं म्हटलं तर अनेक लोक अशी भांडण ऐकायला पहिली तयार असतात. अशा वेळी बघ्यांची गर्दी जमते. सासू सुनेची भांडणं ही घरच्या घरी होतात आणि त्या दोघी पुन्हाल गोड देखील होतात. सासू-सुनेचे नाते हा प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनाचा भाग असतो. भारतीय संस्कृतील सासू-सुनेचे नाते अत्यंत संवेदनशील मानले जाते. अनेकदा लग्नानंतर सासू-सुनेमध्ये खटके उडतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. पण सध्या अशा सासू-सुनांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्या चक्क कोर्टाबाहेरच भांडत सुटल्या आहेत, ज्यामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी हे भांडण पाहण्यासाठी जमली आहे.

सासू आणि सूनेमध्ये चांगले संबंध आहेत असं फार क्वचितच पाहायला मिळतं. अनेकदा त्यांच्यात वाद होताना पाहायला मिळतात. पण सासू सुनेमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकरण नाशकातून समोर आलं आहे. नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यायालयाच्या गेटवर कौटुंबिक वादतून सासू-सून आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार हाणामारी आणि बाचाबाची झाली. सुरुवातीला महिलांमध्ये सुरु असलेल्या हाणामारीमध्ये कुटुंबातील पुरुषही सामील झाले आणि वाद वाढल्याचे पाहायला मिळालं.

न्यायालयीन सुनावणीसाठी तारखेला समोरासमोर आलेल्या सासू आणि सून यांच्यात झालेल्या हिंसक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरुवारी नाशिकच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भांडणाने तिथल्या लोकांना धक्का बसला होता. घरगुती वादातून झालेल्या सासू सुनेच्या मारामारीत पुरुषांसह महिलादेखील एकमेकांना भिडल्याचे पाहायला मिळते.उपस्थितांनी यावेळी मध्यस्थी करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र, दोन्ही गट इतके आक्रमक होते की, मध्यस्थी करणाऱ्यांना देखील ते जुमानत नसल्याचे दिसून आले. या एवढ्या हिंसक पद्धतीनं एकमेकींना मारत होत्या की त्यात त्यांची साडी फाटली याचंही त्यांना भान नाही. अखेर सरकारवाडा पोलिसांनी धाव घेत, दोन्ही गटांना पोलिस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच अशाप्रकारे फ्री स्टाईल हाणामारीचा प्रकार घडल्याने, न्यायालय आवारात दिवसभर एकच चर्चा रंगली होती.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून @ManojSh28986262 या अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे.