Students Kissing in School Video: सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल होणं आता काय नवीन नाही. सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणं, किस करणं आता अगदी सामान्य झालं आहे. पण शाळेतील मुलंही आता मर्यादा ओलांडू लागले आहेत.

विद्येचं मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत विद्यार्थी काहीही करू लागले आहेत. अगदी कशाचंही भान न राखता अश्लील वर्तन करू लागले आहेत. सध्या असाच प्रकार एका शाळेत घडलाय ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. यात एका शाळेतील वर्गात दोन विद्यार्थी एकमेकांना किस करताना दिसतायत.

विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका शाळेत, भरवर्गात सगळ्या विद्यार्थ्यांसमोर एक विद्यार्थी आणि विद्यार्थीनी अश्लील चाळे करताना दिसतायत. व्हिडीओत दिसून येतंय की, एका वर्गात विद्यार्थिनी एका विद्यार्थ्याला फूल देऊन प्रपोज करताना दिसतेय. ती अगदी गुडघ्यांवर बसून त्याला प्रपोज करतो.

नंतर दोघं एकमेकांना मिठी मारून तिथेच सगळ्यांसमोर किस करू लागतात. या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामुळे नेटकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यादरम्यान, ही घटना नेमक्या कुठल्या शाळेत घडली हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @shayaripari01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून वडिल विचार करत असतील की “माझी मुलगी शिकायला गेली आहे” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १७.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “पूर्वी आपण शाळेला विद्येचं मंदिर मानायचो आणि आजचे झेन जी हे सर्व करत आहेत पण अभ्यास अजिबात करत नाहीत.” तर दुसऱ्याने “या सगळ्यांच्या आई वडिलांनी यांना कसले संस्कार दिले आहेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत लिहिलं, “अशा मुलांना शाळेतून हकलून दिलं पाहिजे”