Viral video: ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो, तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला, तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं, तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसं करावं, तसं भरावं, अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण ‘जसे कर्म, तसे फळ‘, असे म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचं आपण वाईट केलं, तर आपल्या बाबतीतही वाईटच घडतं. याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असं म्हणतात की, पैसा, सौंदर्य, ताकद या प्रत्येकाला मर्यादा असते. एक दिवस हे सगळं संपणार आहे हेच या व्हिडीओमधून समोर आलं आहे.

झालं असं की, एका महिलेला विनाकारण त्रास देणाऱ्या एका ट्रकचालकाला त्याच्या चुकीची लगेचच शिक्षा मिळाल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक सायकल उभी आहे. यावेळी तिथून मोठा ट्रक येतो आणि त्याचा चालक सायकल तिथून हटवण्यास सांगतो. रस्त्यावर बऱ्यापैकी जागा असतानाही मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशानं ट्रकचालक तिथेच थांबून राहतो. त्यानंतर महिला त्याच्यासोबत वाद न घातला सायकल बाजूला घेते; मात्र पुढच्याच क्षणी रस्ता खचतो आणि तो ट्रक मोठ्या खड्ड्यात उलटा होतो. हा ट्रक चालक जर एका बाजूने पुढे गेला असता, तर कदाचित तो या अपघाताला बळी पडला नसता. मात्र, दुसऱ्याला त्रास देण्याच्या नादात आणि आपल्याकडे ट्रक हे मोठं वाहन असल्याचा गर्व करीत त्यानं स्वत:चंच नुकसान करून घेतलं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “भाकरी बनवणारा नवरा भेटायला नशीब लागतं” बायकोसाठी बनवली अशी भाकरी की VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ motivemine नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर.” आणखी एका युजरनं म्हटलंय, पुढच्या वेळी तो अशी चूक करणार नाही.”