Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ असे असतात जे आपले डोळे उघडतात, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही इजेंक्शन देऊन पिकवली असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजी विक्रेत्या शेतात असणाऱ्या भाजांना चक्क इंजेक्शन देत आहेत.
सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार डोके सुद्धा वर काढत आहे. अशातच भाजी विक्रेत्याकडून नालीत भाजी धुवून विक्री करणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखं प्रकार आहे. या प्रकारामुळे गंभीर आजार देखील पसरले जाऊ शकतात.अशा भाजी विक्रेत्यावर कारवाईची मागणी नागरीक करत आहेत. या घटनेमुळे आपण घेणारा भाजीपाला किती ताजा आहे हा प्रश्न सतावणारा आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतात दोडका लावला आहे. बऱ्यापैकी दोडका मोठा वाढलेला दिसत आहे. मात्र तरीही या दोडक्यांना कोणत्यातरी ओषधाचं इंजेक्शन देत आहेत. डॉक्टर सांगतात चांगले आरोग्य ठेवायचे असेल तर हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे यांचे नियमित सेवन करा. त्यानुसार आपण भाजी मंडईत जाऊन खरेदीही करतो. पण तुम्हाला माहिती आहे का… या हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळेच आजारांना निमंत्रण देऊ शकतात. तुमच्या प्रकृतीचे संतुलन बिघडवतात. तुम्हाला आजारी पाडतात. विश्वास बसत नाही ना… पण हे खरे आहे.कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी काही व्यापारी फळं पिकवण्यासाठी किंवा भाजा आकर्षक रंग देण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर करतात. ही रसायनं त्वचारोग, पोटाचे विकार आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनाही आमंत्रण देऊ शकतात.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ naturalculture05 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “यांच्यावर लगेच कारवाई करा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, जगायचं की नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.