Viral video: एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली अनेक जोडपी तुम्ही पाहिली असतील. अशी अनेक जोडपी असतात ज्यांना घरातून नात्यासाठी परवानगी नसते. अशावेळी जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप एकमेकांना भेटतात. मांजर दुध पिताना डोळे बंद करून पिते म्हणून तिला वाटते की मला कोणीही पाहत नाही” मात्र तिला सगळे पाहत असतात. असंच काहीसं या प्रेमात पडलेल्या तरुणाईचं असतं. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे पण कधीतरी ते सापडतातच. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. गर्लफ्रेंडला भेटायला आलेल्या बॉयफ्रेंडला घरच्यांनी पकडलं अन् नंतर काय झालं ते तुम्हीच पाहा..

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात शुक्रवारी आपल्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलेल्या एका तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबियांनी पकडून, बांधून आणि बेदम मारहाण केली. संपूर्ण मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विजयपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना श्योपूर जिल्ह्यातील दबीपुरा गावात घडली. हा पुरूष शिवपुरी जिल्ह्यातील गुरिछा गावचा रहिवासी आहे. तो दबीपुरा येथील एका तरुणीशी प्रेमसंबंधात होता आणि तिला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता.तिच्या कुटुंबियांना हे कळताच त्यांनी त्याला पकडले आणि त्याचे हात दोरीने बांधले. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही बनवला.

व्हिडिओमध्ये, तो माणूस रडत आणि माफी मागताना दिसतो. तो कधीही परत न येण्याचे आश्वासन देत आहे. मात्र तरीही, कुटुंब त्याला मारहाण करत आहे. त्याला मदत करण्याऐवजी जवळचे लोक त्यांच्या फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले पण तो माणूस आधीच निघून गेला होता. स्टेशन प्रभारी राकेश शर्मा म्हणाले की, हे प्रकरण गंभीर आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांनी आश्वासन दिले की लवकरच सत्य बाहेर येईल आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जाईल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.