Accident video viral: रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात. कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. ज्यामध्ये एका व्यक्तीचा जीव जाता जाता वाचवला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरून पडलेल्या एका व्यक्तीला वाचवून एका रेल्वे कर्मचाऱ्याने मोठी संभाव्य दुर्घटना टाळली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ही घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कर्मचारी घरी परतत असताना त्याला ट्रेनच्या चाकांजवळ पडलेल्या प्रवाशाला दिसले.त्यानंतर त्याने धाव घेतली आणि त्याला सुरक्षित क्षेत्रात बाहेर काढले. भोपाळ रेल्वे स्थानकावरील ट्रॅकच्या कडेला ही घटना घडली.सुदैवाने, प्रवाशाला कोणतीही इजा झाली नाही.काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.दुसरीकडे, ट्रेनमधील इतर प्रवाशांना ही घटना लक्षात येताच त्यांनी साखळी ओढली. अशा घटनांमुळे वारंवार चिंता निर्माण झाली आहे, विशेषतः रेल्वे रुळांवर.
पाहा व्हिडीओ
‘समधान’ ला शताब्दी एक्सप्रेसने धडक दिली
अलीकडेच, मध्य प्रदेशच्या डाबरा रेल्वे स्थानकावर एक भयानक घटना घडली, जिथे डाबरा रेल्वे स्थानकावर लघवी करताना दोन महिलांना वेगाने येणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसने धडक दिली. त्यापैकी एकीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरीचा अपघातात पाय गेला.
ट्रेनमधून पडण्याच्या घटना वारंवार घडतात
यापूर्वी, उज्जैन रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) दोन अधिकाऱ्यांनी केलेल्या जलद कारवाईमुळे एका तरुणीचा जीव वाचला. एक महिला ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत असताना गेटवरून घसरली, प्रवाशांच्या गर्दीवर लक्ष ठेवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी धाव घेतली आणि महिलेला वाचवले.ही घटना रेल्वे कर्मचाऱ्यांमधील सतर्कतेचे महत्त्व अधोरेखित करते आणि प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्ये चढू नये याची आठवण करून देते.