Viral video: साप, अजगर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यात जगभरात विषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. यातील एक विषारी प्रजाती म्हणजे किंग कोब्रा.किंग कोब्रा म्हणजे जगातील सर्वात खतरनाक सापांपैकी एक आहे. या सापाचं विष इतकं घातक असतं ही त्याने दंश केल्यानंतर काही मिनिटांतच संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो., म्हणून भलेभले प्राणीदेखील त्याच्यापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भल्या मोठ्या किंग कोब्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक प्लंबर नळ दुरुस्त करत असताना तब्बल १० फुटांचा किंग कोब्रा त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. यावेळी दुसरं कोणी असतं तर तिथून पळ काढला असता मात्र या प्लंबरनं धाडस दाखवत या महाकाय किंग कोब्राला चक्क पाईपमध्ये बंद केलं. याचा व्हिडओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल.
किंग कोब्राचे नाव ऐकताच लोक उलटे पाय धरून पळू लागतात. माणसचं काय तर मोठमोठी प्राणीही कधी कोब्राच्या रस्त्याला जात नाहीत. किंग कोब्रा हा धोकादायक आणि विषारी प्राणी आहे, त्याच्या एका दंशानेच तो समोरच्या व्यक्तीला थेट मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. अशात कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे साहस दाखवत नाही.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता घराच्या पाठीमागे एक प्लंबर पाईप दुरुस्त करत होता. तेवढ्यात एक भलामोठा किंग कोब्रा त्याच्या समोर येऊन उभा राहिला. या सापानं मोठा फणाही काढला पण तेवढ्यात प्लंबरने बाजूला पडलेली एक प्लास्टिकची गोणी घेतली आणि हातातील पाईपचा तुकडा त्याला जोडला. मग या पाईपच्या मदतीनं कोब्राला त्या गोणीत घालून बंद करून टाकलं. प्लंबरनं प्रसंगावधान दाखवलं म्हणून त्याचा जीव वाचला. नाहीतर मृत्यू जवळपास निश्चितच होता.
पाहा व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडि @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे. अनेकांनी प्लबंरने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं आहे.