Shocking video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा व्हिडीओ व्हायरल होत आहे. आजकाल सोशल मीडियावर प्रेमाच्या नावाखाली अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. काही जोडपी प्रेमाच्या मर्यादा ओलांडून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना दिसतात. त्यांच्या या कृतीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो; पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही जोडपी एकमेकांच्या प्रेमात इतकी बुडालेली असतात की, आपण कुठे आहोत, याचं भानदेखील त्यांना उरत नाही. यापूर्वी स्टेशनवर रोमान्स करणाऱ्या अनेक कपलचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुणी आणि तरुण एकाच वेळी ट्रेनच्या शौचालयातून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप आणि लाट उसळली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेनमधल्या टॉयलेटचा दरवाजा बराच वेळ बंद दिसतो, यानंतर एक तरुण या टॉयलेटमधून बाहेर येतो. त्यानंतर दरवाजा पुन्हा बंद होतो आणि थोड्याच वेळात एक तरुणी याच टॉयलेटमधून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे एकाच टॉयलेटमध्ये तरुण-तरुणी एकाचवेळी गेल्यानं लोक संताप व्यक्त करत आहेत. व्हिडिओचे नेमके ठिकाण, तारीख आणि वेळ अद्याप कळलेली नाही. त्यानंतर ती तरुणी ट्रेनच्या दरवाजाकडे जाते. ही घटना एका प्रत्यक्षदर्शीने गुप्तपणे रेकॉर्ड केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. अलीकडच्या काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, जिथे असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

या घटनेमुळे सोशल मीडियावर संताप आणि विनोद दोन्ही निर्माण झाले आहेत. काही वापरकर्त्यांनी नैतिकता आणि सार्वजनिक वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी मीम्स आणि विनोदांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.व्हायरल व्हिडिओवरील टिप्पण्यांमध्ये त्याला “लज्जास्पद” म्हणण्यापासून ते “वाइल्ड कार्ड एन्ट्री” आणि “इंडियन रेल्वे आता ओयो हॉटेल्स बनली आहे!” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. दरम्यान लोकसत्ता या व्हिडीओची पुष्टी करत नाही.