Snake Pair Viral Video: सर्व काही शांत होतं… अचानक एका घराच्या छपरावर काहीतरी हालचाल सुरू झाली. घरातील लोकांनी वर पाहिलं आणि जे दृश्य त्यांच्या नजरेस पडलं, ते पाहून त्यांचा थरकाप उडाला. दोन भल्यामोठ्या सर्पांनी एकमेकांना घट्ट वेढलेलं होतं, ते हवेत लटकत असताना त्यांच्या फण्यांच्या हालचाली होत होत्या. काही क्षणांसाठी तर हे दृश्य इतकं थरारक होतं की, लोकांनी श्वासही रोखून धरले. काहींना वाटलं की, ही कोणती तरी लढाई सुरू आहे, तर काहींना तो प्रेमाचा खेळ वाटला. पण, जे काही घडत होतं, ते नक्कीच सहज दिसणारं दृश्य नव्हतं.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांच्या प्रतिक्रिया, भीती, आश्चर्य व आकर्षण यांचा एकाच वेळी मिलाफ झाला होता. ह्या दृश्यानं नाग-नागीण केवळ जमिनीवरच आढळतात, या सर्वसाधारण समजाला धक्का बसला आहे. छपरावर लटकलेली या जोडीचा व्हिडीओ जो बघतो, तो क्षणभर दचकतोच. तुम्हालाही एकदा तरी हा थरारक क्षण अनुभवायचा असेल, तर हा व्हिडीओ आवर्जून पाहा. पण सावध… बघताना तुमच्याही अंगावर नक्कीच शहारे येतील.

सध्या सोशल मीडियावर एक थरारक आणि चकीत करणारा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असं काही दृश्य कैद झालं आहे की, जे पाहून कोणीही हादरून जाईल. तुम्ही कधी नाग आणि नागिणीला एकत्र हवेत लटकताना पाहिलं आहे का? जर नाही, तर हा व्हिडीओ तुमचं डोकंच फिरवून टाकेल एवढं निश्चित.

एका घराच्या छतावर नाग-नागीणीची जोडी एकमेकांमध्ये गुंतून प्रेमाचे रंग उधळतायत. ते छताच्या मागच्या भिंतीवरून लटकलेले होते आणि हवेत आपल्या फण्यांद्वारे एकमेकांना लुभावत होते. काही क्षणांत नाग खाली घसरतो; पण नागीण तेथेच लटकत राहिल्याचे दिसते.

हा व्हिडीओ इतका अदभुत आणि अंगावर शहारे आणणारा आहे की, तो पाहिल्यानंतर अनेकांनी मोबाईलच्या स्क्रीनवरून नजर हटवलीच नाही. जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीनं हा संपूर्ण प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला आणि @AMAZlNGNATURE या ट्विटर (X) हँडलवरून शेअर केला. आणि मग काय, दुनियाभरातून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली.

हा प्रकार भारतातला नसून परदेशातील (ऑस्ट्रेलिया) असल्याचं सांगितलं जात आहे. एक दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि १२ हजारांहून अधिक लाइक्स असलेला हा व्हिडीओ अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरला आहे. काहींनी या दृश्याला प्रकृतीचा चमत्कार म्हटलंय, तर काही जणांनी त्याला “डरावणं आणि विस्मयकारक”, असं म्हटलं आहे.

एकानं लिहिलं, “त्यांना का छेडलं, ते आपोआप निघून गेले असते!” तर दुसऱ्यानं म्हटलं, “अशा दृश्याचं दर्शन होणं समृद्धीचं लक्षण असतं!” काहींनी घरात काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी, असा सल्लाही दिला आहे. कारण- अशा घटनांमुळे भीती वाटणं साहजिक आहे. पण, या व्हिडीओमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली-निसर्ग किती अप्रत्याशित आणि अचंबित करणाऱ्या घटना दाखवून देत असतो.

येथे पाहा व्हिडीओ