Shocking video: भारतात अनेक वेगवगेळ्या धर्माची, जातीची आणि विचारसरणीची लोक राहतात. मात्र या फारकात एक गोष्ट सारखीच आणि ती म्हणजे लोकांची श्रद्धा. देशात धार्मिक पंथाची अनेक लोक पाहायला मिळतात. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक बारीकशी रेष असते. ही रेष कधी ओलांडली जाते ते अनेकदा लोकांना समजत नाही. मात्र या अंधश्रद्धेमुळे नेहमीच वाईट होत नाहीतर कधी कधी चांगल्या गोष्टीही घडतात याचं एक भयानक उदाहरण समोर आलं आहे.
भारतात ड्रायव्हिंगचे नियम अतिशय कडक आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भरावी लागणारी दंडाची रक्कमही पूर्वीपेक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तरी लोकं वाहतुकीचे नियम पाळतील. ट्रॅफिकच्या नियमांचे पालन न केल्यास दंड तर भरावाच लागतो, मात्र तरीही काही महाभाग याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात आणि वाहतूक नियम तोडतात. चौकात कितीही पोलीस उभे असो, सीसीटीव्ही असो तरीही लोक नियम तोडतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ना पोलीस ना सीसीटीव्ही मात्र रस्त्यावरच्या एका गोष्टीला पाहून लोक नियम मोडणं सोडा जागीच थांबत आहेत. काहींनी तर युटर्न घेतला पण गाडी पुढे नेली नाही.
आता तुम्ही म्हणाल यात अंधश्रद्धेचा काय संबंध? तर हो अंधश्रद्धाच..रस्त्याव ठेवलेली गोष्ट म्हणजे लिंबू आणि कुंकू…अंधश्रद्धेचा पगडा किती घट्ट असतो बघा. जिथे ठळक अक्षरात लावलेले वाहतुकीच्या नियमासंदर्भातले बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल्स, सूचना लोक जीवाची पर्वा न करता इग्नोर करतात तिथे निव्वळ लिंबू गुलालाने किती परिणाम लोकांवर होतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चुकीच्या मार्गाने जायला जिथे परवानगी नाही तिथे हा प्रयोग करण्यात आला आणि अक्षरश: एकही गाडी यावरुन गेली. जेवढ्या गाड्या आल्या त्या सगळ्या पुन्हा मागे गेल्या.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांनाच व्हिडीओ पाहून धक्का बसेल. यावर आता नेटकरीही अश्चर्य व्यक्त करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “मेंटालिटी बदलत नाही. नियम पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. नियम मोडणाऱ्या लोकांना परदेशात कडक नियम असतात त्या देशात पाठवावे.” दुसऱ्यानं “२१ व्या शतकातही हे मानतात….. बापरे” म्हंटलंय. तर आणखी एकानं, “ज्या रस्त्यावर प्रमाणाच्या बाहेर खड्डे पडलेले अशा रस्त्यावर हा प्रयोग केला पाहिजे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.