Viral video: वाघ हा जंगलातील सर्वात भयानक शिकारी मानला जातो, हे सर्वांनाच माहीत आहे.त्याचा वेग आणि चपळता अशी आहे की एकदा त्याने एखाद्याला आपला बळी बनवायचं ठरवलं की मग समोरच्या प्राण्याचं त्याच्या तावडीतून वाचणं अशक्य होऊन जातं. कधी लपून हल्ला करून तर कधी समोरून हल्ला करून शिकारीला पकडणं हा वाघाच्या मूळ प्रवृत्तीचा भाग आहे.सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हरिण आणि वाघाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की, मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही.
वाघाच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज आपण सोशल मिडियावर पाहिले असतील पण संपूर्ण कुटुंबाने मिळून केलेल्या शिकारीचे हे दृश्यच न्यारे. एकीचे बळ मोठ्या गोष्टींवर विजय मिळवण्यास मदत करते आणि वाघाच्या कुटुंबानेही हाच विचार करत एकत्र मिळून शिकारीच्या खेळात विजय मिळवला. वाघीण आधी झुडपांमध्ये शांतपणे बसून राहिली आणि हरीण टप्प्यात येताच अवघ्या तीन सेकंदांत झडप घालून त्याला ठार केलं. वाघिणीची ती जबरदस्त ताकद पाहून खरंच तुम्हीही थक्क व्हाल.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जंगलात शिकारीसाठी चांगलीच रणनीती आखल्याचे दिसून येते. दोन वाघ वेगवेगळ्या दिशेला लपलेले असतात तर तिसरा वाघ दूरून येणाऱ्या हरणावर निशाणा साधून असतो. हरीण जवळ येत आहे हे जाणवताच वाघ त्याच्यावर हल्ला करतो. हा हल्ला इतका जबरदस्त असतो की हरणाला आपले प्राण वाचवण्यासाठी संधीच मिळत नाही. हरणाला जमिनीवर पाडताच झुडपात लपलेले इतर दोन वाघही मदत करण्यासाठी जवळ जातात आणि इथेच या व्हिडीओचा शेवट होतो.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @meamitshuklaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो खरंच अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक वारंवार हा व्हिडीओ पाहात आहेत. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एकानं म्हंटलंय, वाघाचं टाईमिंग जबरदस्त आहे, तर आणखी एकानं, “मरण आधीच ठरलेलं असतं” म्हणत हरणाबाबत हळहळ व्यक्त केली आहे.
