Viral video: जीवन आणि मृत्यूच्या दरम्यान आपण जे क्षण जगतो ते खरं आयुष्य असतं. जीवन-मृत्यू हा आयुष्याचा अंत आणि आरंभ आहे म्हटले जाते. असे म्हणतात आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाना जगला पाहिजे कारण मृत्यू कधी काळ म्हणून समोर येईल सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मृत्यूशी सामना होतो. काहीजण मृत्यूच्या दारातून परत येतात. अनेकांची असे अनुभव आपल्याला नेहमी ऐकायला किंवा पाहायला मिळतात. दरम्यान अशाच एका क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदीवरच्या एका ब्रीजवरून ट्रेन जात असातानाच ब्रीजचा पाया कोसळला, त्यानंतर काय झालं तुम्हीच पाहा.

हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धो धो पडणाऱ्या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटनाही दररोज समोर येत आहेत. अशीच एक घटना कांगडा येथील जम्मू रेल्वे मार्गावर घडली आहे. हजारो प्रवाशांनी भरलेली ट्रेन पुलावरून जात असताना रेल्वे पुलाच्या पायाचा मोठा भाग पाण्यात वाहून गेला असल्याची घटना घडली आहे.

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात हजारो प्रवाशांना घेऊन जाणारी एक ट्रेन एका दुर्घटनेतून बचावली आहे. चक्की नदीवरून धावताना, ट्रेनने दिल्ली-जम्मू मार्गावरील एका रेल्वे पूल ओलांडला, त्याच्या काही क्षण आधी तिच्या संरक्षक भिंतीचा काही भाग तीव्र पुरामुळे कोसळला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामुळे रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, ट्रेन रेल्वे पुलावरून हळूहळू पुढे जात असल्याचे दिसून येत आहे, तर चक्की नदी खाली वाहत आहे. ट्रेन पुढे जात असताना, नदीकाठाजवळील पुलाच्या पायाचा एक भाग अचानक तुटतो आणि जोरदार प्रवाहात वाहून जातो. काही क्षणांनंतर, तळाचा आणखी एक भाग नदीत कोसळतो. एक सेकंदात आपला मृत्यू चुकवतो नाहीतर मोठा अपघात झाला असता. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा येतो आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
हेही वाचा >> एक चूक अन् खेळ खल्लास! ‘त्या’ चुकीमुळे एस्केलेटरमध्ये तरुणाचं डोकं अडकलं अन्…; VIDEO पाहून श्वास रोखून धराल

अहवालात असे म्हटले आहे की कोणीही जखमी झाले नाही किंवा रुळावरून घसरले नाही आणि ट्रेन सुरक्षितपणे पूल ओलांडण्यात यशस्वी झाली. व्हिडिओ m@pixelsabhi या प्रोफाईलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकजण म्हणतो की, मृत्यूच्या दारातून परत आले, दैव बलत्तर म्हणून बचावले.