Viral video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. अशा परिस्थितीत लोक कार आणि बाइकवर धोकादायक स्टंट करतात. यावेळी ते केवळ स्वतःचा जीव धोक्यात घालत नाहीत, तर असे लोक इतरांच्या जीवाशीही खेळतात.असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणानं चक्क चालत्या ट्रकमध्ये स्टंटबाजी केलीय. याचा धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तुम्हीही हा व्हिडीओ पाहताना श्वास रोखून धराल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रील बनवण्यासाठी तरुणाची ही स्टंटबाजी सुरु आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहून तुमचाही श्वास थांबेल.काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. काही क्षणाच्या मजेसाठी अशाप्रकारे जीव जाऊ शकतो त्यामुळे तरुणांनी अशाप्रकारे स्टंटबाजी करताना विचार करावा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “एक ट्रक ड्राइव्हर चालू ट्रकमधून बाहेर निघतो. तो ट्रकच्या पुढच्या बाजूने घोळका घालून दुसऱ्या बाजूने पुन्हा ट्रकमध्ये शिरतो. हा ट्रक आणि पुढे चालत असणारा ट्रक दोघांचेही स्पीड जवळजवळ सारखीच असते. पण हा पट्ठ्या एका चालू ट्रकच्या समोरून घोळका कसा घालू शकतो? असा प्रश्न व्हिडीओ पाहताना पडतो. एवढा मोठा धोका पत्करुन हा तरुण स्वत:बरोबरच इतरांच्याही आयुष्याशी खेळत आहे. मात्र याठिकाणी या ट्रक ड्रायव्हरनं फेमस होण्यासाठी सर्वांना फसवलं आहे. ते कसं? तर मुळात, तो ट्रक चालतच नाही आहे. ट्रक एकाच जागी स्तब्ध उभा आहे. मग प्रश्न पडतो की शेजारचा परिसर कसा मागे जात आहे? तर त्याचे उत्तर असे आहे की,”हे ट्रक एका RORO ट्रेनवर उभे आहे. Roro म्हणजे अवजड वाहनांची न्हे आण करणारी ट्रेन! हा ट्रकही अशा ट्रेनवर स्तब्ध-स्थिर उभा आहे आणि ट्रेन सुरु असल्यामुळे शेजारचा परिसर मागे जाताना दिसून येत आहे. याचा फायदा घेत, झटकन Viral होण्यासाठी पट्ठ्याने युक्ती लावत असा पराक्रम केला आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा घडलेला प्रकार नक्की कुठल्या शहरातील आहे ते अद्याप समजलेले नाही. मात्र, सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rareindianclips नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, “जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्याला विचारा आयुष्याची किंमत” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकानं, “स्वत: तर जाईल पण कुण्या निष्पापाचा यात बळी जाईल.” अशी प्रतिक्रिया दिलीय.