Shocking video : लहान मुलांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडंसंही दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चे कंपनी खेळता खेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मूल असल्यास ही बातमी आवर्जून वाचणं गरजेचं आहे. कारण- हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना सध्या समोर आली आहे. यावेळी खेळता खेळता दोन मुलं गॅलरीच्या बाहेर आले आणि १३ व्या मजल्याच्या बाल्कनीला लटकली. हा धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लहान मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही श्वास रोखून धराल..
या इमारतीचा खतरनाक व्हिडीओ शेजाऱ्यांनी काढला अन् व्हिडीओ व्हायरल झाला.व्हायरल क्लिपमध्ये दोन मुलं रेलिंगला घट्ट पकडून लटकल्याचं पाहायला मिळत आहे.
दोन मुलं खेळण्यासाठी १३ व्या मजल्याच्या बाल्कनीतून बाहेर चढले आणि वेगवेगळे कृत्य करू लागले. पण त्यानंतर या मुलांनी स्वत:ला सावरलं आणि धोका टळला. दरम्यान, आई-वडिलांनी त्यांच्या मुलांवर नजर ठेवली पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहिलं पाहिजे. पालकांच्या हलगर्जीपणा मुळे अनेक बालकांना आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना काही नवीन नाही अशीच एक घटना समोर आली आहे. या व्हिडीओमध्येही आई-वडिलांच्या बेजबाबदारपणामुळे मुलं खिडकीच्या बाहेर आली, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nihaochongqing नावाच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन यूजरने शेअर केला आहे. भयानक..असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तर नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं म्हटलंय, “हे भयानक आहे. मुलांना असं एकटं सोडायला नको.” दुसरा म्हणतो, “बापरे! यांचे पालक कुठे आहेत? पुढे त्या मुलाचं काय झालं?” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी व्यक्त करीत आहेत.