Accident video: सोशल मीडियावर दररोज अपघातांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे घडून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. ‘अतिघाई संकटात नेई’, असे म्हणतात. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून आला आहे. काही वेळा लोक घाई-गडबडीत अशा चुका करतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतातात. मात्र, समोर आलेल्या अपघातात अतिघाई अंगलट आली आहे.
एक कचरा गाडी आणि ट्रक यांच्या मध्ये जोरदार धडक झाल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन एक कचरा गाडी जाताना दिसून येते. बाजूला असलेल्या कचराकुंडीतून कचरा उचलण्यासाठी गाडी कडेला थांबते आणि दोन व्यक्ती कचराकुंडीतील कचरा गाडीत टाकण्यासाठी बाहेर येतात. ते कचरा गाडीत टाकत असतानाच मागून एक कार भरधाव वेगाने त्यांच्या दिशेला येते आणि कचरागाडीला जोरदार धडक बसते. या धडकेत दोघेही वाईटरित्या चिरडले गेल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसून येते. या अपघातात कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि कचऱ्याचा डबाही तुटला. दोघेही वाचले की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले असण्याची शक्यता आहे.
पाहा व्हि़डीओ
अति घाई संकटात नेई!
आजच्या जगात कुणाला मागं राहायचं नाही, सगळ्यांना पुढं जायचं असतं. तुम्ही ड्रायव्हींग करत असाल तर ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. प्रत्येकाल आपली गाडी पुढं न्यायची घाई असते. अशावेळी कुठला ड्रायव्हर वा गाडी तुमच्या मार्गात आली तर राग अनावर होता. आणि अशावेळी रस्त्यावर भांडणं होतानाही आपण पाहतो.
हा व्हिडीओ पाहून नेटकरीही संताप व्यक्त करत आहेत. तर गाडी चालवताना आपल्या बरोबरच दुसऱ्याच्याही जीवाचा विचार करावा असा सल्ला देत आहेत.
