Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामधले काही व्हिडीओ हसवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून घाम फुटतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. असा प्रकार तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल एवढं नक्की. सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्राण्यांचे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सापांच्या जोडीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो. साप चावण्याच्या भितीने आपण सावध होत बाजूला जातो. परंतु तुम्ही दोन सापांचं मिलन होताना पाहिलं आहे का?
या व्हायरल व्हिडिओमध्ये सापांची जोडी अचानक बाजूच्या झाडाझुडपातून रस्त्यावर येत असल्याचं दिसत आहे. एकमेकांभोवती वेटोळे घालणारी ही सापाची जोडी बराच काळ रस्त्यावर आहे. साप असे एकमेकांच्या जवळ मिलनाच्या काळातच येतात. सगळ्यांसमोर ते खरंतर असे एकमेकांच्या जवळ येत नाहीत. व्हायरल व्हिडिओमध्ये जे दिसतंय ते बघितल्यानंतर तुमच्या अंगावर काटा उभा राहील.

साप पाहिल्यानंतर लोकांच्या मनात अनेकदा भीती निर्माण होते. पण जर याचऐवजी सापांची जोडी एकमेकांना आलिंगन देत प्रेमालाप करताना दिसून आली तर मग हे रोमांचक दृश्य पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. सापांच्या मिलनाचे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी होत असते. पण असे दृश्य क्वचितच पहायला मिळते. एकमेकांला अलिंगन देत प्रेमात बुडालेले हे दोन साप पाहून पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोघेही साप प्रणयक्रीडा करताना दिसत आहेत. एका जंगल परिसरात या सापांचा रोमान्स सुरू असल्याचं दिसून येतंय. या व्हिडीओमधील हे साप जवळपास आठ फूट लांबीचे असून दोघेही एकमेकांना अलिंगन देत एकमेकांभोवती गुंडाळलेले या व्हिडीओत दिसत आहे. नर आणि मादी दोन्ही साप बराच वेळ एकमेकांना चिकटून राहतात. मात्र यामध्ये संतापजनक बाब म्हणजे बघ्यांनी यावेळी सापाच्या अंगावर कापड टाकण्याचा संतापजनक प्रकार केला आहे.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Mr_cool_king (@officialvishu713)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ officialvishu713 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.