Viral video: घरातील मोठी माणसं सांगतात हॉटेलमध्ये जाऊन खाऊ नका.कारण हॉटेलमध्ये तयार होणाऱ्या अन्न-पदार्थामधील स्वच्छतेबाबत काय संशय असतो. अनेक मोठमोठ्या हॉटेलच्या किचनमध्ये अक्षरश: उंदीर, पाली, झुरळं फिरत असतात. काही हॉटेल्समध्ये खाद्यतेल सुद्धा दुषित स्वरूपात वापरलं जातं.असे कितीतरी व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.म्हणूनच घरचं पौष्टिक खाण्याचा सल्ला दिला जातो. घरचं नेहमीच पौष्टक असतात हेसुद्धा आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मात्र आता विचार करा की, घरी शिजवलेल्या भाजांमध्येही विष आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर…हो तुम्ही स्वत:च बाजारातून विष विकत आणताय..सध्या सोशल मीडियावर एका भाजी विक्रेत्याला व्हिडीओ समोर आला आहे, व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे बाजारातून भाजी विकत घेताना शंभर वेळा विचार कराल.
भाऊ जरा चांगली आणि ताजी भाजी द्या…भाजी विकत घेताना हे वाक्य नेहमीच आपल्या तोंडी असतं. भाजी विकत घ्यायची म्हटली तर आपण ती भाजी ताजी आहे की नाही याची सारखी विचारणा विक्रेत्याला करत असतो. कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. पण तुम्ही विकत घेतलेली भाजी ही गटाराच्या पाण्यात धुतलेली आहे असं कळलं तर नक्कीच मोठा धक्का बसेल. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत भाजी विक्रेता चक्क गटाराच्या वाहत्या पाण्यात भाजी बडवून स्वच्छ करत विकत असल्याचा संतापजनक प्रकार दिसत आहे.
सध्या पावसाच्या सरी सगळीकडे बरसत आहे. यामुळे विविध प्रकारचे आजार डोके सुद्धा वर काढत आहे. अशातच भाजी विक्रेत्याकडून नालीत भाजी धुवून विक्री करणे हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासारखं प्रकार आहे. या प्रकारामुळे गंभीर आजार देखील पसरले जाऊ शकतात.अशा भाजी विक्रेत्यावर कारवाईची मागणी नागरीक करत आहेत.गटाराच्या वाहत्या पाण्यात भाजी धुत असताना यावेळी काही नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि मोबाइलमध्ये कैद केला. या घटनेमुळे आपण घेणारा भाजीपाला किती स्वच्छ आणि ताजा आहे हा प्रश्न सतावणारा आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा फोटो mehandra.8914 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “यांच्यावर लगेच कारवाई करा” तर आणखी एकानं “आता खायचं तरी काय, जगायचं की नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.