Viral video: साप, अजगर पाहताच भल्याभल्यांना घाम फुटतो. यात जगभरात विषारी सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. यातील एक विषारी प्रजाती म्हणजे किंग कोब्रा.किंग कोब्रा म्हणजे जगातील सर्वात खतरनाक सापांपैकी एक आहे. या सापाचं विष इतकं घातक असतं ही त्याने दंश केल्यानंतर काही मिनिटांतच संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो., म्हणून भलेभले प्राणीदेखील त्याच्यापासून अंतर ठेवून राहतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका भल्या मोठ्या किंग कोब्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृद्ध व्यक्तीला किंग कोब्राला पकडणं चांगलंच महागात पडलंय. यावेळी किंग कोब्रानं या व्यक्तीला दंश केला आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदातच या व्यक्तीची काय अवस्थ झाली तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती किंग कोब्रा सापाला पकडण्याचा प्रयत्न करत होता. तो किंग कोब्राला एका बॉटलमध्ये बंद करण्याचा प्रयत्न करत होता मात्र तेवढ्यात किंग कोब्रानं त्या व्यक्तीला दंश केला अन् बघता बघता या व्यक्तीची अवस्था भयंकर होत गेली. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता हा व्यक्ती हळू हळू जमीनीवर कोसळत आहे, त्याच्या चेहऱ्यावरूनही त्याला खूप वेदना होत असल्याचं दिसत आहे. शेवटी तो जमीनीवर कोसळतो तेव्हा आजूबाजूला जमलेले लोक मदतीसाठी पुढे येतात मात्र तो उठत नाही. यावरुनच अंदाज येतो की किंग कोब्रामध्ये किती विष असतं आणि त्याचा परिणाम किती भयंकर होतो.
किंग कोब्राचे नाव ऐकताच लोक उलटे पाय धरून पळू लागतात. माणसचं काय तर मोठमोठी प्राणीही कधी कोब्राच्या रस्त्याला जात नाहीत. किंग कोब्रा हा धोकादायक आणि विषारी प्राणी आहे, त्याच्या एका दंशानेच तो समोरच्या व्यक्तीला थेट मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. अशात कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे साहस दाखवत नाही. मात्र त्याचबरोबर काही अतिउत्साही लोक व्हायरल होण्याच्या नादात किंवा स्वतःला फेमस करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सापांशी खेळताना दिसून येतात. आणि मग नंतर त्याचे असे परिणाम होतात.
पाहा व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडिghanerao_vinod नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील व्यक्त केले आहे.