Viral video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. यातले काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. सध्या समोर आलेला व्हिडीओही असाच आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्की धक्का बसेल.

आपण शाळेत मुलांना किंवा ऑफिसला वेगवेगळे जेवणाचे डब्बे देतो. काही प्लॅस्टिकचे असतात काही स्टिलचे तर काही काचेचे असतात. अशात बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डब्बे उपलब्ध आहेत. मात्र हे डब्बे दिसायला छान, वेगवेगळ्या डिझाईचे असतात म्हणून आपण हौशीने खरेदी करतो. मात्र हेच जेवणाचे डब्बे जिवघेणे ठरू शकतात. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे कसं? तर हा व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, जेवणाच्या प्लॅस्टिकच्या झाकणात अक्षरश: अळ्या झाल्या आहेत. काही वेळा डब्बे असे असतात की ते नीट स्वच्छ करता येत नाही. आणि त्यानंतर त्यात अशाप्रकारे किडे, आळ्या होऊ शकतात. जे आपल्या पोटात गेल्या तर आपल्या जीवावरही बेतू शकतात. त्यामुळे खास करून लहान मुलांना डब्बे देताना ते डब्बे रोजच्या स्वच्छ करणे आणि योग्य डब्ब्यांची निवड करणे महत्त्वाचे आहे. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ wasim_shaikh1137 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “सुविधा जेवढ्या चांगल्या तेवढ्यात वाईट”, “उद्या आपल्याबरोबरही हे घडलं, तर आश्चर्य वाटायला नको” अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. ए तर अनेकांनी स्वच्छतेचा सल्ला दिला आहे.