Railway accident video: बदलत्या जगात सोशल मीडियावर सक्रिय राहणे ही काळाची गरज बनत चालली आहे. प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. मग ते प्रत्येक क्षणाचे फोटोज सोशल मीडियावर टाकणे असो किंवा वारंवार सेल्फी काढणे असो.कधी कधी आपण लाइक्स आणि व्ह्यूजच्या नादात अशा काही करामती करतो. ज्यामुळे आपल्या इतर अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागते. ज्यामुळे आपला जीव ही जाऊ शकतो. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून तुम्ही देखील सेल्फी काढत असाल तर काळजाचा ठोका चुकावणारा हा व्हिडीओ तुम्हीही पाहा. रेल्वे ट्रॅकवर उभे राहून सेल्फी काढणे काही महिलांनी चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जर तुम्ही रेल्वे ट्रॅक किंवा प्लॅटफॉर्मवर ट्रेनच्या जवळ सेल्फी घेत असाल तर सावध राहा कारण तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला आयुष्याला मुकावं लागेल किंवा आयुष्यभराचं अपंगत्व येऊ शकतं. काय झालं नक्की या महिलांसोबत तुम्हीही पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे ट्रॅकवर काही महिला उभ्या आहेत. यावेळी समोरुन एक ट्रेन येते, जेव्हा ही ट्रेन लांब होती तेव्हाच महिलांनी ट्रेन येत असल्याचं पाहिलं आहे. मात्र तरीही या पाठिमागे गेल्या नाहीत. उलटं तिथेच त्या सेल्फी घेऊ लागल्या. यावेळी त्यातल्या एका महिलेने सेल्फी कॅमेरानं व्हिडीओ घ्यायला सुरुवात केली अन् तितक्यात वेगानं ट्रेन आली. यामध्ये सेल्फी घेणारी महिला बचावली मात्र तिथे उभी असलेल्या महिलेला मात्र ट्रेनची जोरदार धडक बसली. तिच्या हाताला ट्रेनची प्रचंड जोरात धडक बसली. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेताना जीवही जाऊ शकतो त्यामुळे हे असले प्रकार करताना १०० वेळा विचार करा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> मनालीमधील अटल टनल बोगद्यातील VIDEO व्हायरल; धडकी भरवणारे ७ सेकंद अन्…
रेल्वे अधिनियम १९८९ द्वारा कलम १४५ व १४७ च्या अंतर्गत रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेणे कायद्याने गुन्हा आहे. या नियमानुसार तुम्हाला शिक्षा होऊ शकते. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेताना जीवही जाऊ शकतो त्यामुळे हे टाळण्यासाठी १००० रुपये दंड आणि ६ महिन्यांचा कारावास भोगावा लागेल.