Fruit Safety Viral Video: उन्हाळा म्हटलं की आंब्याचं नाव अगदी पहिल्यांदा आठवतं. फळांचा राजा असलेला आंबा म्हणजेच गोडसर, रसाळ आणि मोहक स्वादाचा अनुभव. एप्रिलपासून सुरू झालेली ही चविष्ट सफर, पावसाळ्याच्या उंबरठ्यावरसुद्धा संपत नाही. पण, या आंब्यांच्या मोहापायी जर आरोग्याचाच धोका निर्माण होत असेल तर…? पावसाच्या आगमनानंतर आंबा खाणं आरोग्यास अपायकारक ठरू शकतं, असं केवळ आजी-आजोबांचं नव्हे तर काही तज्ज्ञांचंही म्हणणं आहे. पावसाळ्यातही बाजारात पिवळसर, रसाळ आंब्यांची रेलचेल पाहायला मिळते. पण, जर हेच आंबे खाणं जीवघेणं ठरलं तर? असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या..
रसाळ आंब्यातून निघालं हे काय?
हा प्रकार बिहारमधील गोपालगंज येथे घडला आहे. जिथे एका महिलेनं बाजारातून ताजे वाटणारे आंबे विकत घेतले आणि जे घडलं, त्यानं संपूर्ण कुटुंब हादरलं. ३२ वर्षांच्या राधिका देवी यांनी बाजारातून बाहेरून अगदी टवटवीत वाटणारे पिकलेले आंबे विकत घेतले. त्यांच्या पतीने, संतोष यादव यांनी एक आंबा सोलून खाण्यास सुरुवात केली, पण काही घास घेतल्यानंतर त्यांच्या तोंडात विचित्र काहीतरी जाणवलं. नीट पाहिल्यावर लक्षात आलं की, त्या आंब्यांच्या गराच्या आत लहान, पांढऱ्या रंगाचे जिवंत किडे हालचाल करत होते. काही घास आधीच घेतल्याने संतोष यांना उलटीही झाली.
घाबरलेल्या राधिकाने केला VIDEO VIRAL
हा भयानक प्रकार पाहून घाबरलेल्या राधिकाने तात्काळ आंब्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि इतर लोकांनाही सावध करण्यासाठी तो सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओमध्ये ती म्हणते, “बाहेरून काहीच संशयास्पद नव्हतं, इतकं घृणास्पद दृश्य आम्ही कधी पाहिलं नव्हतं!”
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय
युजर्स म्हणत आहेत, “आता पुन्हा आंबे खाण्याआधी १०० वेळा विचार करावा लागेल.” काहींनी तर फळांचे विक्रेते आणि अन्न सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोपालगंजचे अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश चंद्र यांनी सांगितलं की, उन्हाळा आणि पावसाळा यामध्ये फळांमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांनी विक्रेत्यांना स्वच्छ व थंड ठिकाणी फळं साठवण्याचा सल्ला दिला आणि ग्राहकांनी फळं खरेदी करताना बाहेरून आणि आतूनही नीट तपासण्याचं आवाहन केलं आहे.
येथे पाहा व्हिडीओ
सावधान! अशा किडांनी भरलेल्या फळांमुळे फंगल किंवा बॅक्टेरियल संसर्ग होऊ शकतो, जो आरोग्यास गंभीर धोका ठरू शकतो!