जगभरातील प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक देशाचे एक वेगळेपण असते. अनेकवेळा एखाद्या देशात अशा काही गोष्टी अशा असतात ज्या ऐकताना किंवा बघताना आपल्याला फार वेगळ्या किंवा विचित्र वाटतात. असाच एक विचित्र प्रकार बेल्जियममधून समोर आला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, येथील एका बारमध्ये लोकांना शूजच्या बदल्यात बिअर दिली जाते. म्हणजेच तुम्ही तुमच्या घरून शूज घेऊन यायचे आहेत आणि ते बिअर शॉपमध्ये जमा करायचे आहेत, त्याबदल्यात बार मालक तुम्हाला पाहिजे ती बिअर देईल.
शूज दिल्यानंतरच का दिली जाते बिअर?
आता तुम्ही असा विचार करत असाल की, या बारमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शूजवर बिअर प्यायला मिळेल, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. खरंतर हा नियम असा आहे की, तुम्ही या बारमध्ये सोल चांगले असलेले शूज द्यावे लागतील. तसेच फ्लिप-फ्लॉप आणि सँडलवर तुम्हाला बिअर प्यायला दिली जात नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बारमध्ये शूज दिल्यानंतर तुम्हाला काही मोफत बिअर दिली जात नाही, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतात. शूज फक्त यासाठी जमा केले जातात जेणेकरून कोणताही ग्राहक बारमधून ग्लास चोरुन घेऊ जाऊ नये.
बार मालकाला कशी सुचली ही कल्पना?
बारमधून ग्लास चोरी होत असल्याने त्रस्त झालेल्या बार मालकाने ही युक्ती वापरली आहे. गेल्या काही काळापासून बेल्जियममधील बार मालक ग्लास चोरीच्या घटनांमुळे त्रस्त होते. अशावेळी एका बार मालकाला ही कल्पना सुचली. ज्यात आता जो कोणी बारमध्ये बिअर प्यायला येईल, तो जोपर्यंत बारमध्ये शूज जमा करत नाही तोपर्यंत बार मालक त्यांना बिअर देत नाहीत. ग्राहकांनी बिअर पिल्यानंतर ग्लास दिल्यावर हे शूज त्यांना परत दिले जातात. तर दुसरीकडे कुणाला पैसे आणि ग्लास द्यायचा नसेल तर तो शूज न घेताच निघून जातो. मात्र, असे करणारे फार कमी लोक आहेत. बरेच लोक त्यांचे शूज परत घेतात आणि बिअरचे पैसे घेऊन घरी जातात.