शॉपिंग सेंटर आणि मॉल्समध्ये खरेदी करणे महिला आणि लहान मुलांना फार आवडते. येथे खरेदीवर मिळणाऱ्या ऑफर्स विशेषत: महिलांना फार आकर्षित करतात. त्यामुळे हल्ली घरातील लहान- मोठी कसलीही खरेदी असू दे, पालक आपल्या मुलांना घेऊन शॉपिंग मॉल्समध्ये जातात. याठिकाणी अगदी किचनपासून ते कपड्यांपर्यंत अनेक लहान मोठ्या वस्तू खरेदी करता येतात. पण जगात असा एक मॉल आहे जिथे लहान मुलांना प्रवेश करण्यास बंदी आहे. अशापरिस्थितीत लहान मुलांनी मॉलमध्ये प्रवेश करु नये यासाठी गेटवर बाऊन्सर तैनात करण्यात आले आहेत. तसेच मुलांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण या मागे नेमकं काय कारण आहे जाणून घेऊ…
मॉलमध्ये लहान मुलांना ‘नो एन्ट्री’
मेट्रोच्या अहवालानुसार, दक्षिण पूर्व लंडनमध्ये असलेल्या टद ग्लेड्स या शॉपिंग मॉलटने हा अजब निर्णय घेतला आहे. जो २५ जुलैपासून लागू होणार आहे. लहान मुलं मॉलमध्ये येऊन गोंधळ घालून हिंसाचार निर्माण करतील, अशी भीती मॉलच्या मालकांना वाटते. कारण काही दिवसांपूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या होत्या, यात अमेरिकेत सामूहिक हिंसाचाराच्या अनेक घटना पाहायला मिळाल्या. त्यामुळे मॉल व्यवस्थापन चांगलेच धास्तावले आहेत. यामुळे मॉल मालकांच्या निर्णयाला आता पोलिसांनीही परवानगी दिली आहे. पण यामागचे मुख्य कारण अद्याप समोर आले नाही.
आंघोळीसाठी संपूर्ण कुटुंबाने एकच साबण वापरणे चुकीचे की बरोबर? होऊ शकते ‘हे’ नुकसान
लोकांच्या मते, मॉल ही एक निरुपयोगी जागा आहे. जर इथे तुम्ही थोडा वेळ घालवलात तर तुमच्या लक्षात येईल की, याठिकाणी काही उपद्रवी तरुण दिसतात, जे अनेकदा गुंडगिरी करत गोंधळ घालतात. परंतु बहुतेक गुंड टोळी करुन येतात आणि खरेदीदारांना धमकावतात. ते खरेदीदारांना घाबरवण्यासाठी लहान मुलांचा वापर करतात. मार्च महिन्यात तरुणांच्या एका गटाने मॉलमध्ये शिरून बरीच उलथापालथ केली. त्यांना रोखताना चार पोलीस अधिकारी जखमी झाले होते.