पुणेकरांच्या नादाला कोणीही लागत नाही कारण पुणेकरांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता येते तेही आपल्या पुणेरी शैलीत. पुणेकर अनेकदा पुणेरी पाटी द्वारे टोमणे मारून स्वार्थी आणि बेशिस्त लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. कधी नियम उल्लंघन करणार्यांसाठी पाटी लावतात तर कधी स्वार्थी लोकांना सत्याचा आरसा दाखवतात. अशाच एका पुणेरी पाटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
या फोटोतील पाटीवर लिहिले आहे की,” साधी सरळ माणसे मूर्ख नसतात, ते समोरच्याला चांगलं समजत असतात” व्हायरल पुणेरी पाटीवर प्रत्येकाशी चांगुलपणाने वागणाऱ्या व्यक्तीच्यावतीने लिहिलेली आहे आणि अशा चांगल्या लोकांचा फायदा घेणार्या स्वार्थी लोकांना शाब्दिक टोला लगावला आहे. कारण स्वार्थी लोक इतरांच्या चांगुलपणाला त्यांचा मूर्खपणा समजतात आणि स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करतात पण चांगुलपणाने वागणारी व्यक्ती कधीच मूर्ख नसते ती समोरच्याला चांगलं समजते. कारण असे म्हटले जाते की “व्यक्ती स्वत: जसा असतो तसचं जग त्याला दिसते” म्हणून चांगल्या व्यक्तीला सर्वजण चांगले आहे असे वाटते आणि स्वार्थी व्यक्तीला प्रत्येक व्यक्ती स्वार्थीच वाटतो त्यामुळे असे लोक इतरांशी देखील काहीतरी स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सबंध ठेवतात. चांगल्या व्यक्तीला स्वार्थी व्यक्ती आणि त्याचा स्वार्थी हेतू दोन्ही कळतो पण तरीही तो समोरच्याला समजून घेऊन त्याला पुन्हा एक संधी देतो. हा त्याचा चांगुलपणा असतो मूर्खपणा नाही. स्वार्थी लोक मात्र लोकांच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहतात. अशा लोकांना सुधारण्यासाठी कधी कधी शब्दांचा वापर करावा लागतो तो पुणेकरांना व्यवस्थित करता येतो. ही पुणेरी पाटी अशा स्वार्थी लोकांना टोमणा मारणारी आहे जी वाचून अनेकांना त्यांच्या आयुष्यातील स्वार्थी किंवा चांगले लोकांची आठवण करून देत आहे.
हेही वाचा – किती ही क्रूरता! उंटाचे पाय दुमडून बसवले चक्क बाईकवर, Viral Video पाहून संतापले लोक
इंस्टाग्रामवर aapalviralpune नावाच्या पेजवर ही स्टोरी शेअर केली आहे. ही पाटी वाचून स्वार्थी लोकांना त्यांच्या आयुष्यातील चांगल्या माणसांच्या चांगुलपणाचा सन्मान करण्याची आणि चांगल्या माणसांना त्यांचा चांगुलपणा हा त्यांचा मुर्खपणा नाही याची आठवण करून देत आहे. तुम्हाला ही पाटी वाचून कोणाची आठवण आली?