Viral Video : एखाद्या कार्यक्रमासाठी वेशभूषा करायची असेल किंवा घरात पूजा असेल तेव्हा स्त्रिया, महिला, तरुणी या अनेकदा साडी नेसतात. देवघरात पूजा करताना, सत्यनारायणाच्या पूजेला बसताना काही जण डोक्यावर पदर घेऊन बसतात. पण, डोक्यावर ठेवलेला हा पदर अनेकदा सरकतो आणि खाली पडतो. मग, आपण पुन्हा त्याला डोक्यावर ठेवतो; असे अनेकदा होते आणि आपण कंटाळून जातो. पण, आज एका व्हायरल व्हिडीओत यासाठी एक सोपी पद्धत सांगण्यात आली आहे. एका युजरने डोक्यावर पदर राहण्यासाठी एक सोपी टीप (Tip) सांगितली आहे, ज्याचा उपयोग तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा.

डोक्यावर पदर व्यवस्थित राहण्यासाठी फक्त दोन वस्तूंचा उपयोग करायचा आहे. पहिला हेअरबँड आणि दुसरा, दोन सेफ्टी पिन (Safety Pin).

१. सगळ्यात आधी साडी नेसली असेल तर त्याचा पदर पुढे घ्या.
२. नंतर पदराच्या उलट्या बाजूला दोन सेफ्टी पिन लावून घ्या.
३. साडीच्या पदरावर आतल्या बाजूला दोन सेफ्टी पिन अश्या पद्धतीत लावून घ्या की, त्यात हेअरबँडचा वरचा भाग अगदी घट्ट बसून राहील.
४. साडीच्या पदराला हेअरबँड व्यवस्थित लागल्यानंतर तो डोक्यावर लावून घ्या.
५. आणि तुमचा पदर अगदी डोक्यावर तुम्हाला व्यवस्थित राहिलेला दिसेल.
कशाप्रकारे युजरने डोक्यावर पदर राहण्यासाठी सोपी टीप दाखवली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…फक्त दोन शिट्टी द्या अन् कुकरमध्ये कढवा तूप; पाहा तूप बनवण्याची नवी पद्धत, Viral Video

व्हिडीओ नक्की बघा :

View this post on Instagram

A post shared by Karishma Dheeraj (@karishma_dheeraj3)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Karishma_dhiraj3 या युजरने शेअर केला आहे. करिष्मा असे या युजरचे नाव आहे. युजर अनेकदा तरुणी, स्त्रिया आणि महिलांसाठी रोजच्या जीवनातील उपयोगी अशा अनेक सोप्या टिप्स व्हिडीओतून दाखवत असते. तसेच हा व्हिडीओ पाहून अनेकांना ही युक्ती उपयोगी वाटते आहे, तर काही जण आम्ही ही टीप नक्की वापरून पाहणार असे आवर्जून सांगताना दिसत आहेत. तुम्हीदेखील या सोप्या टीपचा उपयोग डोक्यावर साडीचा पदर किंवा ओढणी घेताना नक्की करून बघू शकता..