Cute sister and brother video: सोशल मीडियावर सध्या एक गोड व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात भावा-बहिणीमधील निरागस, निखळ आणि खरं प्रेम दिसतंय. आजच्या वेगवान आणि डिजिटल जगात जिथं भावना दाखवण्यासाठी रील्स आणि फिल्टर्सची गरज भासते, तिथं या छोट्या भावाच्या एका साध्या क्षणाने लोकांच्या मनात घर केल आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यांत आपुलकी दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ दोन लहान भावा-बहिणींमधल्या गोड नात्याबद्दल आहे. मोठा भाऊ शाळेतून बॅग घेऊन घरी परतताना दिसतो आणि त्याला पाहताच लहान बहीण आनंदाने उड्या मारते. त्याचा आनंद, आणि त्या क्षणातील नैसर्गिक भावनांनी संपूर्ण इंटरनेटचं लक्ष वेधलं आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला मोठा भाऊ शाळेची बॅग पाठीवर घेऊन घराकडे चालत असतो. दाराजवळ उभी असलेली लहान बहीण त्याला लांबून पाहते आणि क्षणातच आनंदाने ओरडते. ती इतकी खूश होते की थेट धावत मोठ्या भावाकडे जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते. मोठा भाऊही प्रेमाने तिला पपी देतो आणि उचलून घेतो. या क्षणात कोणतेही शब्द नाहीत, पण त्या मिठीतूनच सगळ्या भावना उमटतात. दोघांचे हसरे चेहरे आणि त्यांचं ते एकत्र येणं, हे दृश्य पाहून आजूबाजूच्या लोकांना हसू आवरले नाही.

पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर होताच काही तासांतच हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाले. अनेकांनी तो “आजचा सर्वात गोड व्हिडीओ” असं म्हटलं. एका युजरने लिहिलं, “खरं प्रेम म्हणजे असंच नात्यातील खरेपणा!” तर दुसऱ्याने म्हटलं, “आजकालच्या रील्समध्ये जे इमोशन्स दिसत नाहीत, ते या मुलांच्या चेहऱ्यावर दिसतायत.” अनेकांनी इमोजी देऊन व्हिडीओ शेअर केला आणि म्हटलं, “अशा नात्यांमध्येच खरी श्रीमंती आहे.”

या व्हिडीओतून एक सुंदर संदेश मिळतो, प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज नसते, भावनांचं मनापासून प्रदर्शन पुरेसं असतं. शाळेतून परतलेल्या मोठ्या भावाचं स्वागत करताना लहान बहिणीने दाखवलेला आनंद सांगतो की खरी खुशी मोठ्या गोष्टींमध्ये नाही, तर अशा छोट्या, प्रेमळ क्षणांत दडलेली असते. हा गोड व्हिडीओ केवळ सोशल मीडियावरच नाही, तर पाहणाऱ्यांच्या मनातही घर करून राहिला आहे