Viral video: मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस आणि सापाची अशीच कडवी झुंज पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधितदेखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो कोब्रा आणि मुंगूस यांच्याशी संबंधित आहे. साप आणि मुंगूस यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरीदेखील लोक त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओदेखील दोघांच्या भांडणाचाच आहे. यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा पराभव झाला हे पाहूया.

मुंगूसाशी पंगा घेणं पडलं भारी

अलीकडेच पाटणा विमानतळावर एक नाट्यमय चकमक झाली, धावपट्टीवर मुंगूसांच्या त्रिकूटाने सापावर हल्ला केला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. एका कोब्राला मुंगूसाशी पंगा घेणं चांगलंच महागात पडलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सुरुवातीला मुंगूस आणि कोब्रा यांच्यात लढाई सुरू असल्याचे दिसते. मुंगूस जवळ येताच कोब्रा त्याच्यावर हल्ला करतो. कोब्रा दोनदा असं करतो, पण त्याचा प्रयत्न कामी येत नाही. मुंगूसावर काहीही परिणाम होत नाही. मुंगूस इकडे तिकडे कोब्राच्या बाजूने फिरत आणि योग्य संधी साधत कोब्रावर घाव घालतो. त्यानंतर काही वेळातच आणखी दोन मुंगूस रिंगणात सामील होतात आणि एक कोब्रा आणि तीन मुंगूसांमध्ये लढाई सुरू होते. कोब्रा आपले डोके उंचावून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो, परंतु मुंगूस कोब्रावर हल्ला करतात. यावेळी तीन तीन मुंगूस असल्याने कोब्रा त्यांच्यासमोर दुबळा ठरला आहे.

मुंगूस आणि साप शतकानुशतके शत्रू आहेत. त्यांच्या शत्रुत्वाचे मुख्य कारण म्हणजे शिकार. साप मुंगूस आणि त्याच्या पिल्लांची शिकार करतो, तर मुंगूस सापांची शिकार करतो आणि खातो. हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पहिला आहे आणि त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मिनिटभर उशिर झाल्याने विमान चुकलं पण आयुष्य वाचलं; ब्राझीलमध्ये प्लेन क्रॅश झालं पण तो कसा वाचला पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Tanishq Punjabi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओवर अनेक वापरकर्ते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही वापरकर्त्यांनी सापाला गरीब म्हटले, तर काहींनी मुंगूस धाडसी म्हटले आहे.