Viral video: मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस आणि सापाची अशीच कडवी झुंज पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधीत आहे. साप आणि मुंगूस यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरी देखील लोक त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील दोघांच्या भांडणाचाच आहे. यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा पराभव झाला हे पाहुया.

अखेर कोण जिंकलं

भर रस्त्यात मुंगूस आणि सापाचा हा संघर्ष सुरू होता. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक साप फणा काढलेला दिसत आहे. काही वेळानं एक मुंगूस रस्ता ओलांडून त्याच्याकडे जातो. मुंगूस जवळ येताच साप त्याच्यावर हल्ला करतो. साप दोनदा असं करतो, पण त्याच्या प्रयत्न कामी येत नाही. मुंगूसावर काहीही परिणाम होत नाही. मुंगूस इकडे तिकडे सापाच्या बाजूने फिरतं आणि योग्य संधी साधत सापावर घाव घालतो. सापाचं तोडं त्याच्या तोंडात पकडून ओढत तो त्यला झुडुपात घेऊन जातो.अशाप्रकारे धाडसी मुंगूसानं सापाची शिकार केली. हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पहिला आहे आणि त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! आधी कारनं चिरडलं मग उडवलं, तरीही दुसऱ्याच क्षणी मुलगा उठून पळाला

bilal_aakil_vlogs नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओवर अनेक वापरकर्ते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही वापरकर्त्यांनी सापाला गरीब म्हटले तर काहींनी मुंगूस धाडसी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात