Video viral: सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. एक तरुणी घरात घुसलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न कर असताना सापानं तिच्यावर भयंकर पद्धतीने हल्ला केलाय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तमचाही थरकाप उडेल.
साप हा मानवाचा मित्र आहे, तो शेतातील उंदीर खाऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण करतो. साप हा विषारी असो अथवा बिनविषारी त्याला धोका जाणवल्यास तो आपल्यावर हल्ला करणारच हे नक्की, त्यामुळे सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, मात्र काहीजण अनुभव नसताना सापाला पकडण्याचा प्रयत्न करतात आणि फसतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सर्पमित्र तरुणी घरात घुसलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी चिडलेला साप जोरात हवेत उडी मारतो आणि थेट तरुणीच्या तोंडावर हल्ला करतो. यावेळी तरुणी मागे होताना दिसत आहे. मात्र शेवटी जीवाची बाजी लावून ती सापाला पकडतेच. अशाप्रकारे एखाद्या वेळी जीवही जाण्याची शक्यता आहे. सर्पमित्र असूनही प्रत्येक वेळी सापाला पकडण्यात यश येईलच असं नाही त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हे दृश्य खूप भितीदायक दिसते, कारण सापाचा हल्ला खूप धोकादायक असू शकतो. याचे विष क्षणार्धात कोणालाही मृत्यूच्या दारी पोहचवण्यासाठी पुरेस असत.
पाहा व्हिडीओ
या घटनेचा व्हिडिओ snake_rescuer_deepika नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.